पुणे जिल्हयातील शिरुरमध्ये पतीने पत्नीसह सासूवर चक्क गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. या गोळीबारामध्ये पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला असून सासू गंभीररीत्या जखमी झाली आहे. शिरुर कोर्ट परिसरात ही घटना घडली. कौंटुंबिक वादातून ही खळबळजनक घटना घडली. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहेत. गंभीर जखमी झालेल्या सासूवर सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत पत्नीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून गोळीबारानंतर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. कोर्ट परिसरात घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. पोलीस सध्या या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, अजूनही याप्रकरणी कुणाला अटक करण्यात आली असल्याची माहित समोर आलेली नाही.

कौटुंबिक वादातून जावयानं मायलेकींवर गोळ्या झाडल्या असल्याचं सांगितलं जातंय. यानंतर कोर्ट परिसर हादरुन गेला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गोळीबार झालेल्या ठिकाणी जाऊन तपासाला सुरुवात केलीये. पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्या पडला होता. यावेळी कोर्ट परिसरात असलेली लोकांनी या महिलेच्या मृतदेहाशेजारी एकच गर्दी केली होती. उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीनं जखमी अवस्थेत असलेल्या सासूला रुग्णालयात दाखल केलंय. त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.