Friday, April 19, 2024
HomeMarathi News Todayपुणेकर सावधान !...तुम्ही नकली पनीर खाताय?...FDA ची मोठी कारवाई

पुणेकर सावधान !…तुम्ही नकली पनीर खाताय?…FDA ची मोठी कारवाई

Share

पुण्यात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरु आहे, सोबतच गौरीच्या आगमनानिमित्य प्रसादाचे मोठ्या प्रमाणात घरोघरी कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे बाजारात भाजीपाल्यासह दुग्धजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणत विक्री होत आहे. यात प्रामुख्याने पनीर याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर पनीर खाणार्यांसाठी मोठी बातमी आहे. पुणे औषधी प्रशासनाने एक नकली पनीर बनविणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात पनीर जप्त केले आहे.

हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील एम. आर. एस डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारला असता याठिकाणी नकली पनीर बनवत असल्याचे आढळून आले. येथे कारवाई करत अन्न व औषध प्रशासनाने साठा जप्त केला आहे.

पुणे FDA (अन्न आणि औषध प्रशासन) ने पुण्यातील मांजरी खुर्द येथील एका बेकायदेशीर कारखान्यावर छापा टाकून सुमारे 1.98 लाख रुपये किमतीचे 900 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले. २.२४ लाख रुपयांचे स्किम्ड मिल्क पावडर आणि आरबीडी पामोलिन तेलही जप्त करण्यात आले.

सदर कारवाई संजय नारागुडे, सहाय्यक आयुक्त, एफडीए, पुणे यांच्या मार्गदर्शनात पथकाने केली आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: