HomeBreaking Newsराज्यसभा निवडणूक । महाविकास आघाडी सरकारला असदुद्दीन ओवेसींची खुली ऑफर…

राज्यसभा निवडणूक । महाविकास आघाडी सरकारला असदुद्दीन ओवेसींची खुली ऑफर…

होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना Shivsena व BJP भाजपामध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. हि निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून मतांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. तर यावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी Asaduddin Owaisi यांनी महाविकास आघाडीने आमच्याशी संपर्क केल्यास त्यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करू, असे वक्तव्य केले आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीने आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही. महाराष्ट्रातील एमआयएम AIMIM च्या आमदारांनाही मविआच्या नेत्यांकडून संपर्क साधण्यात आलेला नाही. आम्ही 2 दिवस त्यांची वाट पाहू, अशी भूमिका आज ओवेसी यांनी जाहीर केली.

येत्या 10 जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीनिमित्त राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यात आता एमआयएमने एंट्री केली आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना ओवेसी म्हणाले, राज्यसभेसाठी 10 तारखेला निवडणूक होत आहे. त्यामुळे आम्ही आणखी 2 दिवस मविआकडून काही प्रतिसाद मिळतो का, याची वाट पाहू. त्यानंतर आम्ही निवडणुकीबाबत निर्णय घेऊ, असे ओवेसी यांनी सांगितले.

राज्यसभा निवडणुकीत आपले उमेदवार जिंकून आणण्यासाठी मविआला आमची गरज आहे. त्यामुळे मविआच्या नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ओवेसी यांनी केले. तसेच, मविआला पाठिंबा देण्याबाबत महाराष्ट्रातील नेत्यांशीही बोलणे झाले आहे. राज्यात धुळे आणि मालेगाव येथे एमआयएमचे 2 आमदार आहेत. या 2 आमदारांनी कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय आपण 2 दिवसानंतर घेणार असल्याचे ओवेसी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments