Friday, April 19, 2024
HomeSocial TrendingRamesh Sagar | बँकेच्या चुकीमुळे त्याच्या खात्यात आले ११ हजार कोटींहून अधिक…अन...

Ramesh Sagar | बँकेच्या चुकीमुळे त्याच्या खात्यात आले ११ हजार कोटींहून अधिक…अन त्यानेही असं केलं संधीच सोने…

Share

Ramesh Sagar Ahmedabad – बँकिंग प्रणालीच्या चुकांमुळे पैसे चुकीच्या खात्यात जात असल्याच्या अनेक बातम्या येतात, परंतु ही बातमी खूप मनोरंजक आहे. बँक चुकीमुळे गुजरातमधील एका व्यक्तीच्या डिमॅट खात्यात 11,677 कोटी रुपये जमा झाले. मग काय शेयर व्यापारी रमेश सागर Ramesh Sagar यांची जणू लॉटरीच लागली. ही रक्कम हुशारीने वापरून त्यांनी दोन कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले आणि लाखो रुपयांचा नफा कमावला.

ही घटना अहमदाबादमधील आहे. रमेश सागर हे शेअर बाजारात खरेदी-विक्री करतात. म्हणूनच त्याने कोटक सिक्युरिटीजमध्ये आपले डीमॅट खाते उघडले आहे. शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे पैसे या खात्यातून येत-जात राहतात.

सागरच्या म्हणण्यानुसार, 27 जुलै रोजी त्याच्यासोबत एक अनोखी घटना घडली. त्याच्या डिमॅट खात्यात 11,677 कोटी रुपये आले. संधी पाहून त्यांनी तात्काळ यातील दोन कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. या गुंतवणुकीवर त्यांना पाच लाख रुपयांचा नफाही झाला.

काही तासांच्या या ‘गैरव्यवहारा’चा त्यांना फायदा झाला, तर बँकेला चूक लक्षात येताच त्यांनी त्याच दिवशी रात्री आठ वाजता चुकून आलेले सर्व पैसे कापून घेतले. चुकून हस्तांतरित केलेली रक्कमच बँकेतून काढता येत असल्याने त्याने आपल्या चतुराईने किंवा हुशारीने पाच लाख रुपये कमावले.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: