Homeगुन्हेगारीरामटेक । अल्पवयीन मुलीवर तरुणाचा लैंगीक अत्याचार...काचुरवाही जवळील खंडाळा येथील घटना...

रामटेक । अल्पवयीन मुलीवर तरुणाचा लैंगीक अत्याचार…काचुरवाही जवळील खंडाळा येथील घटना…

आरोपीला अटक, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )

तालुक्यातील तथा काचुरवाही जवळील खंडाळा येथील रहीवाशी असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच २० वर्षीय तरुणाने लैंगीक अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. घटनेमुळे सर्वीकडे खळबळ उडालेली आहे.

प्रणय मोहुर्ले वय २० वर्ष असे आरोपीचे नाव असुन तो खंडाळा गावातीलच रहीवाशी आहे. पोलीस स्टेशन रामटेक येथुन प्राप्त माहीतीनुसार पिडीत मुलगी व आरोपी प्रणय हे खंडाळा गावातीलच रहीवाशी असुन त्यांचे गेल्या एक वर्षापासुन प्रेमसंबंध होते. दरम्यान पिडीतेच्या घरी पिडीतेशिवाय कुणीही नसल्याचे पाहुन आरोपी प्रणय ने संधीचा फायदा घेत पिडीत अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केला.

यानंतर पिडितेने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांजवळ सांगीतला असता कुटुंबीयांनी सरळ रामटेक पोलीस स्टेशन गाठले व घडलेला संपूर्ण प्रकार सांगीतला व तक्रार नोंदविली. रामटेक पोलीसांनी कलम ३७६ (३), ३७६ (२) (जे ) भा.दं.वी. सहकलम ४,६ पोक्सो नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केलेली आहे. पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
राजू वसंतराव कापसे शितलवाडी परसोडा रामटेक जि, नागपूर हे महाव्हाईस न्यूज चे संस्थापक सदस्य असून ते गेल्या पाच वर्षापासून रामटेक प्रतिनिधी म्हणून काम सांभाळतात...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments