Homeराज्यरामटेक । शहरात महिलांनी केला हरितालिका उत्सव उत्साहात साजरा...

रामटेक । शहरात महिलांनी केला हरितालिका उत्सव उत्साहात साजरा…

विसर्जनासाठी राखी तलाव येथे उमटली महिलांची गर्दी

रामटेक- ( तालुका प्रतिनिधी )

शहरात महिलांनी हरितालिका उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी शहरातील राखी तलावावर गौरी विसर्जनासाठी महिलांनी एकच गर्दी केलेली होती.

हरितालिका हा सण सुवासिनी महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करीत असतात. हरितालिकाला महिला उपवास करीत असून दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात. आज दिनांक ३१ ऑगस्टला शहरातील राखी तलावावर जाऊन महिलांनी गौरीची पूजा अर्चना करून विसर्जन केले.

दरम्यान राखी तलाव येथे नगर परिषदेतर्फे उत्तम अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यामध्ये तलावाच्या काठावरच्या पायऱ्यावर दोरखंड बांधण्यात आलेला होता तसेच एक नाव व काही तैराकी यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तटस्थ करण्यात आलेले होते.

तसेच गौरी विसर्जनासाठी कृत्रिम पाण्याचे टाके सुद्धा ठेवण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाकडून पोलीस कर्मचारी व महिला होमगार्ड यावेळी तैनात करण्यात आलेले होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
राजू वसंतराव कापसे शितलवाडी परसोडा रामटेक जि, नागपूर हे महाव्हाईस न्यूज चे संस्थापक सदस्य असून ते गेल्या पाच वर्षापासून रामटेक प्रतिनिधी म्हणून काम सांभाळतात...
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments