Homeगुन्हेगारीरामटेक । लग्नाला विरोध…प्रेमीयुगुलाने केले विष प्राषण…प्रेयसीचा मृत्यु तर प्रियकराची मृत्युशी झुंज...

रामटेक । लग्नाला विरोध…प्रेमीयुगुलाने केले विष प्राषण…प्रेयसीचा मृत्यु तर प्रियकराची मृत्युशी झुंज…

आदिवासीबहुल भागातील रयतवाडी येथील घटना…

रामटेक-: राजु कापसे

लग्नाला घरच्यांचा विरोध दर्शविल्याने प्रेमीयुगुलाने विष प्राषण करीत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. यात प्रेयसीचा मृत्यू झाला तर प्रियकर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. अश्विनी रामेश्वर उईके (२२, रा. फुलझरी जंगली) असे मृत तरुणीचे नाव आहे तर अरुण सुखदास कोडवाते (२२, रा. रयतवाडी वडांबा) असे तिच्या प्रियकराचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, अरुण सुखदास कोडवाते हा गवंडी काम करतो. तो फुलारी येथे कामावर जात होता. दोन वर्षांपूर्वी त्याची अश्विनीशी ओळख झाली. कालांतराने या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. १ सप्टेंबर रोजी ते दोघेही रयतवाडी येथे आले.

दुसऱ्या दिवशी अश्विनीचे दोन भाऊ तिला रयतवाडी येथे भेटायला गेले. त्यांनी अश्विनीला घरी चलण्यास सांगितले. दोघांचेही विधीवत लग्न लावून देतो, असेही सांगितले मात्र अश्विनी भावांचे ऐकून घेण्यास तयार नव्हती. यानंतर भाऊ रागाने निघून गेल्याने अश्विनी व अरुण यांच्यात वाद झाला. दोघांनीही उंदीर मारण्याकरिता घरी आणलेले औषध प्राशन केले. त्यांच्या तोंडातून फेस निघत असल्याचे अरुणच्या आईच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली.

शेजारच्यांनी त्या दोघांनाही देवलापारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मेडिकलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. मात्र सोमवारी अश्विनीची प्राणज्योत मालवली तर अरुणची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी घोडके करीत आहेत.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
राजू वसंतराव कापसे शितलवाडी परसोडा रामटेक जि, नागपूर हे महाव्हाईस न्यूज चे संस्थापक सदस्य असून ते गेल्या पाच वर्षापासून रामटेक प्रतिनिधी म्हणून काम सांभाळतात...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments