Homeखेळरामटेक | रागीट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी...

रामटेक | रागीट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी…

रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे 3 ते 7 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये क्रीडा महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये या क्रीडा महोत्सवासाठी निवड फेरी घेण्यात आली होती. यामध्ये कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची खो-खो या स्पर्धेसाठी विद्यापीठस्तरीय निवड झाली आहे.

त्यामध्ये इंद्रजीत परतेती, स्वप्निल सलामे, बादल उईके, ओमशंकर वाडीवे, अभय वाडीवे, बंडू धुर्वे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर कु.अश्विनी उइके या विद्यार्थिनीची कबड्डी च्या गटामध्ये निवड झालेली आहे. महाविद्यालयातील संस्थाध्यक्ष रविकांत रागीट व प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा. उर्मिला नाईक, प्रा.चेतना ऊके, प्रा.निकिता अंबादे, प्रा.गंगा मोंढे, प्रा.शालू वानखेडे, प्रा.किरण शेंद्रे, प्रा.कला मेश्राम, प्रा.डाँली कळमकर, प्रा.मयुरी टेंभुर्णे, गीता समर्थ, प्रा.ज्ञानेश्वर नेवारे, अतुल बुरडकर, सुरेश कारेमोरे, राजेंद्र मोहनकर, संदीप ठाकरे, या सर्वांनी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक प्रा. अनिल मिरासे यांचे अभीनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments