Homeराज्यRamtek | शासकीय भंगार वाहनांचा लिलाव केव्हा?…नादुरुस्त उत्तम स्थितीतील वाहनांचे होत आहे...

Ramtek | शासकीय भंगार वाहनांचा लिलाव केव्हा?…नादुरुस्त उत्तम स्थितीतील वाहनांचे होत आहे भंगारात रुपांतर…

शासनासह वरीष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभुत…शासनाचा कोटींचा निधी पाण्यात

राजु कापसे
रामटेक

शासकीय कार्यालय म्हटले म्हणजे त्यासोबतच शाशकिय वाहन आले. संबंधीत कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्यांसाठी तथा त्यांच्या सोयीसाठी शासनाने करून ठेवलेली ही तरतुद असते. असे असले तरी मात्र हे वाहन वापरत असतांना काही या वाहनात किरकोळ बिघाड आला तर त्याच्या खर्चाची तरतुद संबंधीत कार्यालय अधिकारी कसाबसा उचलतो मात्र मोठा बिघाड आला व मोठ्या खर्चाची बाब पुढे आली तर त्याची तरतुद कशी करावी हा प्रश्न उभा ठाकतो. स्वतः खर्च करून शासनाकडे बिले सादर करून पहातो म्हटले किंवा त्या वाहनाच्या दुरुस्तीसाठीच्या निधीबाबद शाशनाकडे प्रस्ताव सादर केला तर ” शासकीय काम आणि वर्षभर थांब ” याप्रमाणे दुरुस्तीचे संपुर्ण काम थंडबस्त्यात जात असते व अशातच ती वाहणे नादुरुस्त स्थितीत उन – पावसात वर्षानुवर्ष पडुन राहातात व कालांतराने त्यांचे रूपांतर भंगारात होत असते. शहरातील कित्येक शासकिय कार्यालयातील शाशकीय वाहाने भंगारात पडलेली असुन कमीत कमी त्याचा लिलाव तरी लवकर करून एक उत्तम मोबदला मिळेल याबाबद विचार करण्यास शाशन व त्यांचे वरीष्ठ प्रशाषकिय अधिकारी उदासीन असल्याचे दिसुन येत आहे.

शहरातील शाशकीय कार्यालर्यांमध्ये निरखुन पाहिल्यास लघुसिंचन उपविभाग, रामटेक, वनविभाग रामटेक, बांधकाम विभाग तथा इतर काही कार्यालयांमध्ये भंगारातील वाहने खितपत पडलेली आहे. यामध्ये उल्लेखनिय म्हणजे ही वाहाने ज्यावेळी नादुरुस्त होऊन बंद स्थितीत संबधीत कार्यालयात उभी झाली त्यावेळी त्यांची स्थिती उत्तम होती. त्यावेळी जर त्यांना दुरुस्त करण्यात आले असते तर ती कार्यालयाच्या कामात आली असती किंवा त्याचवेळी अशा वाहनांचा लिलाव केला असता तर त्याचा मोबादला तरी शाशनास बऱ्यापैकी प्राप्त झाला असता यात दुमत नाही. मात्र शासनाच्या व त्यांनी नेमलेल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उदासीन व दुर्लक्षीत धोरणाने या गंभीर बाबीकडे पुरेपुर दुर्लक्ष केल्याचे दिसुन येते व परीणामस्वरूप उत्तम स्थितीतील नादुरुस्त वाहानांचे भंगारात रूपांतर झालेले आहे. एकाच जागेवर नादुरुस्त स्थितीत वर्षानुवर्षे उभे राहाल्याने वाहानांची चाके कामातुन गेली. बॉडीला जंग चढला. आतील पार्टस कामातुन गेले. त्यामुळे अशी वाहाने आता लोहालोखंड व्यापाऱ्याकडे किलोच्या भावाने विकण्याजोगी झाली आहेत. याचे जणु शाशनाला व त्यांनी नेमलेल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना काहीही सोयरसुतक नाही असेच आता दिसु लागलेले आहे.

नवीन तथा उत्तम स्थितीतील वाहाने भंगाराच्या मार्गावर
स्थानिक जि.प. लघुसिंचन उपविभाग रामटेक कार्यालयाला गेल्या २०१४ – १५ वर्षादरम्यान एक नविन पोकलँड व दोन नविन टिप्पर उपलब्ध करून देण्यात आले होते. लघुसिंचनाची कामे सुकर व्हावी हा उदात्त हेतु शाशनाचा असावा. असे असले तरी मात्र कार्यालयाला वाहाने उपलब्ध होताच काही कालावधीनंतरच या वाहानांमध्ये मोठा बिघाड आला, त्याचा खर्चही मोठाच म्हणजे लाखोंच्या आकडेवारीत होता. तेव्हापासुन ती वाहाने कार्यालयात उभी करण्यात आली आहेत व ती भंगार होण्याच्या मार्गावर आहेत. तेव्हा अशी वाहाने शाशकीय कार्यालयाला देण्यापेक्षा व कालांतराने लाखोंचा भुर्दंड शाशकीय तिजोरीवर व्यर्थ बसविण्यापेक्षा एखाद्या कंत्राटदाराला संबंधीत काम देऊन त्याच्याकडुन तथा त्याच्या वाहानांकडुन कामे उरकवुन घेणे हेच परवडण्यासारखे राहिल असे मत काही अधिकारी – कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त करून दाखविले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments