Homeराज्यकार्यालयीन वेळेत बंद असणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना टाळे ठोकण्याचा राष्ट्रविकास सेनेचा इशारा...

कार्यालयीन वेळेत बंद असणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना टाळे ठोकण्याचा राष्ट्रविकास सेनेचा इशारा…

सांगली – ज्योती मोरे

सांगली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती या कार्यालयीन वेळेत बंद असतात ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे ग्रामसेवक क्लार्क शिपाई हे शासनाचा पगार घेऊनही ग्रामपंचायतीमध्ये हजर नसतात अशा ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकास सरपंचावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि ग्रामपंचायत बॉडी बरखास्त करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रविकास सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय हे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू ठेवण्यात यावे. कारण नागरिकांना वेगवेगळे दाखले, विवाह नोंदणी, मृत्यू नोंदणी यासह इतर अनेक कामांसाठी ग्रामपंचायतीत यावं लागते. मात्र ग्रामपंचायत बंद असेल तर, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. याचा विचार करून जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायतीसह कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा अशा ग्रामपंचायतींना राष्ट्रविकास सेनेकडून टाळे ठोकण्याचा इशारा, युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments