Homeराज्यमिरजेत शिव भोजन थाळी मिळणाऱ्या हॉटेल वेंकटेश्वरा येथे गुंडांचा दारू पिऊन धिंगाणा...

मिरजेत शिव भोजन थाळी मिळणाऱ्या हॉटेल वेंकटेश्वरा येथे गुंडांचा दारू पिऊन धिंगाणा…

सांगली – ज्योती मोरे

मिरजेत शिवभोजन थाळी मिळणाऱ्या जुने एसटी स्टँड रोड समोरील हॉटेल व्यंकटेश्वरा येथे दोन गुंडाने मॅनेजर महिला कर्मचारी स्टाफला शिवीगाळ करत तोडफोड करत धिंगाणा घातला.
जेवण देण्याच्या कारणावरून त्यांनी तेथील मॅनेजर आणि महिला कर्मचारी आदींना अश्लील भाषेत शिवीगाळ केली एवढेच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोटोवर लाथा मारून त्याची तोडफोड केली.

याबाबतची अधिक माहिती अशी की हॉटेल वेंकटेश्वरा येथे महाराष्ट्र शासनाच्या शिवभोजन थाळीचे वाटप केले जाते. या शिवभोजन थाळी ची मागणी करत यातील एक युवक हॉटेलमध्ये आला होता . त्याने दारू आणि गांजा सेवन केला होता. हॉटेलमध्ये प्रवेश करत असतानाच तो गुंड अश्लील बडबडत आला होता. तेथील महिला कर्मचाऱ्याने अश्लील बोलू नका.

येथे माणसे जेवण करीत आहेत तुम्हाला जेवण हवे असेल तर पार्सल घेऊन जावा असे सांगितले यावर त्या गुंडाने जेवण करणार असे सांगितले यावर तेथील कर्मचाऱ्यांनी तुम्ही दारू पिली आहे इतर लोकांना त्रास होतो त्यामुळे जेवण पार्सल घेऊन जावा असे सांगितल्यावर त्याला राग आला आणि तो युवक तो गुंड दुसऱ्या गुंडाला घेऊन आला. आणि या दोघांनी हॉटेलमधील कर्मचारी मॅनेजर महिला कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत तोडफोड आणि नासधूस केली.

हॉटेल चे कर्मचारी भयभीत झाले मालक विष्णू विठोबा बेलारी बाहेर गेल्याने त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही मालकांना सहित कर्मचारी जिवाला घाबरून याची वाच्यता कोठे होऊं दिली नाही. व्यवसायात परिणाम होईल अशी भीती त्यांना वाटू लागली.

शनिवार दिनांक 4 जून रोजी हा प्रकार घडला काल दिनांक 7 जुन रोजी हॉटेल वेंकटेश्वराचे मालक श्री विष्णू विठोबा बेल्लारी यांनी भाजप कार्यकर्ते ओमकार शुक्ल यांच्याशी संपर्क साधला आणि घडलेली हकीकत सांगितली. या दोन्ही गुंडावर वर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप सांस्कृतिक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष ओमकार शुक्ल यांनी केली आहे. आज सकाळी मिरज शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली जाणार आहे. या गुंडांची माहिती काढली असता हे गुंड खाजा बस्ती येथील रहिवासी असल्याचे काही जणांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments