Tuesday, April 16, 2024
Homeनोकरीजिल्हा परिषदांच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील पदभरती वेळापत्रक घोषित...

जिल्हा परिषदांच्या अखत्यारितील आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील पदभरती वेळापत्रक घोषित…

Share

१५ व १६ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन परीक्षा…

आकोट – संजय आठवले

मार्च, २०१९ महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट -क संवर्गाच्या पदभरतीबाबत दि. १० मे २०२२ च्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असुन त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे यापूढे सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.

सदर शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागाशी संबधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने वेळापत्रक जारी करण्यात आले असून दिनांक १५ व १६ सप्टेंबर रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्याचे निर्धारित करण्यात आले आहे.

सदर पदभरती घेण्याच्या अनुषंगाने तसेच याबाबतच्या परिक्षा पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या अध्यक्षेते खाली अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता.

याबाबत सर्व जिल्हा परिषदांशी सल्लामसलत करून आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील पदभरती बाबत परिक्षेचे वेळापत्रक ठरविण्यात येऊन शासनास सादर करण्याबाबत अध्यक्ष, राज्यस्तरीय समन्वय समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांना कळविण्यात आले होते.

त्यानुसार अध्यक्ष, राज्यस्तरीय समन्वय समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांनी शासनास सदर परिक्षेचे संभाव्य वेळापत्रक तसेच कृती आराखडा सादर केला आहे. सदर शिफारशींस अनुसरून माहे मार्च, २०१९ व माहे ऑगस्ट, २०२१ ( अपंग व इतर सुधारित आरक्षणासह ) च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अत्यारितील गट क मधील आरोग्य विभागाशी संबंधित ५ संवर्गातील पदभरती बाबत सर्व जिल्हा परिषदांना परीक्षेबाबतचे संभाव्य वेळापत्रक तसेच इतर सुचना कळविण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्यानुसार मार्च, २०१९ व माहे ऑगस्ट, २०२१ ( अपंग व इतर सुधारित आरक्षणासह ) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोग्य विभागाशी संबंधित ५ संवर्गातील पदभरती करण्याकरीता परिक्षा घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम ( वेळापत्रक) निश्चित करण्यात आले आहे.

त्यानुसार दिनांक १५ सप्टेंबर रोजी आरोग्य पर्यवेक्षक (सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० पर्यंत) आणि औषध निर्माता (दुपारी ०३.०० ते ०५.०० पर्यंत ) तर दिनांक १६ सप्टेंबर रोजी आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका (सकाळी ११.००ते दुपारी ०१.०० पर्यंत) तथा प्रयोगशाळा तंत्रज्ञ (दुपारी ०३.०० ते ०५.०० पर्यंत) ऑनलाइन परीक्षा देऊ शकणार आहेत.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: