Thursday, April 25, 2024
Homeशिक्षणशिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर २०२२ महिन्याचा पगार दिवाळीपुर्वी द्यावा...शरद झामरे पाटील

शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर २०२२ महिन्याचा पगार दिवाळीपुर्वी द्यावा…शरद झामरे पाटील

Share

शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर २०२२ महिन्याचा पगार दिवाळीपुर्वी मिळावा यासाठी अकोला जिल्हाधिकारी यांना पदवीधर युवा शक्ती असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शरद पाटील झामरे यांनी निवेदन देवून केले आहे.

येत्या २४, २५ व २६ ऑक्टोंबर २०२२ ला दिवाळी सण आहे. मात्र दिवाळी सण खरेदी आणि दिवे लागणे धनत्रोयदशीला म्हणजे २२ ऑक्टोंबर २०२२ ला आहे. दिवाळी हा महाराष्ट्रासाठी मोठा सण आहे. कोरोना काळ संपून वर्ष उलटले मात्र तरी ही काही ठिकाणी शिक्षकांचे पगार उशिराने होत आहे. गृह कर्ज आणि इतर हप्ते भरण्यास विलंब झाल्यामुळे आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे.

कृपया राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विशेष शाळांसह सर्वच शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबरचा पगार थकबाकी व महागाई भत्त्यासह दिवाळी सणापुर्वी होणे बाबत संबंधीतांना आदेश देण्यात यावे ही विनंती शरद झामरे पाटील यांनी केली आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: