Homeराज्यरामटेक नगरपरीषद निवडणुकीचे आरक्षण निकाल...

रामटेक नगरपरीषद निवडणुकीचे आरक्षण निकाल…

रामटेक – राजु कापसे

नगरपरिषद रामटेक च्या २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकीमध्ये महिलांसाठी दि. १३ मार्च ला नगर परीषद रामटेकमध्ये आरक्षण काढण्यात आले.शहरात १० प्रभाग तयार करण्यात आले असुन प्रत्येक प्रभागात २ उमेदवार राहाणार आहेत.

शहराची एकुण लोकसंख्या २२३१० असुन यामध्ये अनुसुचीत जातीच्या ३०४० व अनुसुचीत जमातीच्या १३८७ लोकसंख्या आहे. शहरात पुर्वी १७ न.प. सदस्य होते, आता त्यांची संख्या वाढुन २० झालेली आहे.

प्रभाग क्र. १अ, ७अ, ९अ मध्ये अनुसुचीत जाती व प्रभाग ८अ मध्ये अनुसुचीत जमाती सर्वसाधारण आरक्षीत करण्यात आले आहे. राहिलेले प्रभाग २अ, ३अ, ४अ, ५अ, ६अ, तथा १०अ मध्ये सर्वसाधारण ( ओपन ) महिलांसाठी आरक्षीत आहे. प्रभाग क्र. १ ते १० ब सर्वसाधारण ( ओपन ) आहे.

नगरपरिषद रामटेक मध्ये उपविभागिय अधिकारी वंदना सवरंगपते यांचे मार्गदर्शनात आरक्षण काढण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अर्चना मेंढे, व शहरातील विविध पार्टीचे कार्यकर्ता उपस्थित होते. आरक्षण सोडत जाहीर होताच विविध पार्टी चे कार्यकर्ता निवडणुकीसाठी सक्रिय झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments