Homeराज्यनव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम दहावी परीक्षेचा निकाल सलग ८ वर्षे...

नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम दहावी परीक्षेचा निकाल सलग ८ वर्षे १०० टक्के…

सांगली – ज्योती मोरे

कुपवाड येथील नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम आणि गुरुकुल मधील विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेत सलग आठ वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
कोरोनाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने घालून दिलेल्या सर्व कोरोना निर्बंधांचे पालन करत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आले.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरज फाऊंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये रोबोटिक्स, वैदिक गणित , अबॅकस, क्रीडो साहित्यातून शिक्षण, कोडींग, आय. आय.टी फाउंडेशन कोर्स मल्टी स्किल,लैंग्वेज लॅब, ऑक्सी पार्क इत्यादी प्रकारचे विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात . त्याच बरोबर कम्प्यूटर लॅब, थ्रीडी प्रिंटिंग, बस सुविधा, सायन्स लॅब , सुसज्ज ग्रंथालय, पालक आणि विद्यार्थी विमा संरक्षण, यासारख्या विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो.

प्रथम पाच विद्यार्थी (मराठी माध्यम)

प्रथम क्रमांक. प्रणाली सुनिल पाटील =96.00%
द्वितीय क्रमांक. श्रीयश विनोद शिंदे=95.40%
तृतीय क्रमांक. अर्पिता संतोष माळी=91.20%
चतुर्थ क्रमांक- श्रेया राजेंद्र बन्ने=90.40%
पंचम क्रमांक- सार्थक प्रशांत पालकर=88.40%
नव कृष्णा व्हॅली गुरुकुल
प्रथम क्रमांक. सार्थकी बाळासाहेब माने=87.40
द्वितीय क्रमांक. गायत्री आप्पासो कुंभार=85.20
तृतीय क्रमांक. विश्वजीत सुखदेव खांडेकर 81.80
चतुर्थ क्रमांक-आदित्य संजय पवार=73.20%
पंचम क्रमांक-कुणाल विकास पाटील=69.20%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक श्री. प्रवीण शेठ लुंकड, संस्थेचे सचिव श्री. एन. जी कामत, चेअरमन श्री. यशवंत तोरो, नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार, नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता पागनीस, वस्तीगृह प्रमुख श्री. संतोष बैरागी, गुरुकुल मुख्याध्यापिका सौ. विनिता रावळ, संगणक विभाग प्रमुख श्री. राजेंद्र पाचोरे. अकाउंट विभाग प्रमुख श्री. श्रीशैल्य मोटगी, क्रीडा विभाग प्रमुख श्री. विनायक जोशी,पालक प्रतिनिधी व पालक, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments