Homeराज्यराज्यसभा द्विवार्षिक निवडणूक २०२२ चा निकाल जाहीर; ७ उमेदवारांपैकी ६ उमेदवार विजयी...

राज्यसभा द्विवार्षिक निवडणूक २०२२ चा निकाल जाहीर; ७ उमेदवारांपैकी ६ उमेदवार विजयी घोषित…

मुंबई – महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी काल दिनांक 10 जून 2022 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून या राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीत 7 उमेदवारांपैकी 6 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले.

विजयी उमेदवारांच्या निवडणूक  क्रमवारीनुसार पियुष वेदप्रकाश गोयल यांना पहिल्या फेरीत 4800 मत मूल्य, डॉ.अनिल सुखदेवराव बोंडे यांना पहिल्या फेरीत 4800 मत मूल्य मिळाले आहे. इम्रान प्रतापगढी यांना पहिल्या फेरीत 4400 मत मूल्य मिळाली आहे.

प्रफ्फुल मनोहरभाई पटेल यांना पहिल्या फेरीत 4300 मत मूल्य मिळाली असून संजय राजाराम राऊत यांनाही पहिल्या फेरीत 4100 मत मूल्य मिळाली आहेत. तर धनंजय भीमराव महाडिक यांना तिसऱ्या फेरीत 4156 मत मूल्य मिळाली असून हे सर्व 6 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांनी केलेल्या मतदानात 284 मते वैध ठरली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments