Homeमनोरंजन‘लालबागच्या राजा’ च्या दरबारी ‘रूप नगर के चीते’...

‘लालबागच्या राजा’ च्या दरबारी ‘रूप नगर के चीते’…

मुंबई – गणेश तळेकर

लालबागच्या राजाच्या चरणी आगामी ‘रूप नगर के चीते’ या मराठी चित्रपटाच्या कलाकारांनी नुकतीच हजेरी लावली. आणि चित्रपटाच्या यशासाठी बाप्पाचा आशिर्वाद घेतला. हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत आणि ‘लालबागचा राजा’च्या जयघोषात आपल्या चित्रपटाचे नवीन पोस्टर ही याप्रसंगी बाप्पाच्या चरणी अर्पण केले. १६ सप्टेंबरला ‘रूप नगर के चीते’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या धामधुमीत लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनाची संधी कलाकारांनी सोडली नाही.

याप्रसंगी चित्रपटातील कलाकार करण परब, कुणाल शुक्ल, आयुषी भावे, हेमल इंगळे, सना प्रभू, निर्माते मनन शाह आणि दिग्दर्शक विहान सूर्यवंशी लालबागच्या राजाच्या दरबारी हजर होते. सध्या प्रमोशनसाठी विविध ठिकाणी या चित्रपटाची टीम भेट देत आहे. या चित्रपटाची निर्मीती एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी केली असून दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांचे आहे.

मनाच्या आतमध्ये स्वत:शी युद्ध सुरू असताना आपण करतोय ते चूक की बरोबर? याची शहानिशा करण्यासाठी आपल्या आत डोकावणारा जवळचा मित्र गरजेचा असतो. त्याचंही म्हणणं ऐकणं महत्त्वाचं असतं, याच मैत्रीच्या बंधाची अनोखी गोष्ट ‘रूप नगर के चीते’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments