Wednesday, April 24, 2024
Homeगुन्हेगारीअकोला । RTO जयश्री दुतोंडे यांनी केली खाजगी लक्झरी बसची तपासणी... तपासणीत...

अकोला । RTO जयश्री दुतोंडे यांनी केली खाजगी लक्झरी बसची तपासणी… तपासणीत ४० बसेस वर केली कारवाई…

Share

उपप्रादेशिक कार्यालय अकोला येथील माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती जयश्री दुतोंडे यांच्या आदेशानुसार प्रवासी बस तपासणी मोहीम अंतर्गत दिनांक 8 ऑक्टोंबर 2022 पासून आज रोजी पर्यंत एकूण 120 प्रवासी बसेसची तपासणी केली त्यामध्ये एकूण 40 बसेस वर कारवाई करण्यात आली व पाच बसेस अटकावून ठेवण्यात आलेले आहे. या मोहिमेद्वारे एकूण साडेचार लाख रुपये कर व दंड वसूल करण्यात आलेले आहे.

आज दिनांक 21 ऑक्टोंबर 2022 रोजी माननीय उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती जयश्री दुतोंडे मॅडम स्वतः उपस्थित राहून यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन निरीक्षक श्री प्रफुल्ल मेश्राम,सहायक मोटर वाहन निरीक्षक श्री कृष्णा नेवरे, श्री दिगंबर महाले, श्री भागवत चोपडे व वाहन चालक श्री गौतम अरखराव प्रवासी बस तपासणी करण्यात आली व वाहन चालक यांना फुलगुच्छ देऊन त्यांना वाहन सुरक्षित चालवण्याबद्दल मार्गदर्शन केले.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: