HomeUncategorizedज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या मृत्यूची बातमी अफवाच...पत्नी वृषाली गोखले यांनी दिली...

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या मृत्यूची बातमी अफवाच…पत्नी वृषाली गोखले यांनी दिली माहिती…

कालपासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर सर्रास पसरवली जात आहे तर अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते सध्या व्हेंटिलेटर असून डॉक्टर प्रकृतीची काळजी घेत आहे. अशी माहिती त्यांची पत्नी वृषाली गोखले यांनी दिली आहे.

“बुधवारी दुपारी ते कोमात गेले आणि तेव्हापासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीयेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. पुढे काय करायचं हे सकाळी डॉक्टर ठरवतील. त्यांची प्रकृती सुधारतेय का, ते प्रतिसाद देत आहेत का, यावरून डॉक्टर पुढील निर्णय घेतील”, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

विक्रम गोखले हे 5 नोव्हेंबरपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल असल्याचंही त्यांनी सांगितलं. “त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र आता पुन्हा ती बिघडली. हृदयाशी आणि किडनीशी संबंधित समस्या त्यांना जाणवत आहेत. त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे”, असं वृषाली गोखले यांनी सांगितलं. विक्रम गोखले यांची एक मुलगी परदेशी राहते. ती सॅन फ्रान्सिस्कोहून पुहाण्याला परतली आहे. तर दुसरी मुलगीही सध्या पुण्यातच आहे.

विक्रम गोखले यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा सर्व व्यासपीठांवर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. रंगभूमीवर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. 2016 मध्ये त्यांनी घशाच्या त्रासामुळे नाटकातून संन्यास घेतला होता.

विक्रम गोखले यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलं. याच महिन्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments