Homeसामाजिकजिल्हा मध्यवर्ती बँकेत सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांना अभिवादन...

जिल्हा मध्यवर्ती बँकेत सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांना अभिवादन…

सांगली – ज्योती मोरे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष, माजी खासदार, सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेसमोरील पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पृथ्वीराज (बाबा) पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सहकार चळवळीतील गुणवत्ता वाढीस लागण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांच्या विचारसरणीचा अभ्यास करून सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांनी आखलेली ध्येयधोरणे चिरंतन व दूरगामी परिणाम करणारी होती. सहकारी क्षेत्रामध्ये त्यांचे कार्यकर्तृत्व दीपस्तंभासारखे प्रकाश देणारे आहे. सत्तेसाठी व स्वार्थासाठी त्यांनी राजकारण केले नाही.

ग्रामीण जीवनाची समृद्धी सहकारी चळवळीतून सामर्थ्यशाली करता येईल अशी त्यांची डोळस श्रद्धा होती. कोणत्याही पदाची हाव न धरता अखंडपणे समाजोद्धाराचे कार्य केले. स्वतःच्या सुखाचा विचार त्यांनी कटाक्षाने टाळला व समाजकार्याला अग्रक्रम दिला.

यावेळी खासदार संजयकाका पाटील, आ. मोहनराव कदम, आ. अनिल बाबर, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील, संचालक विशाल पाटील, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, मनोज शिंदे, सत्यजित देशमुख, संग्रामसिंह देशमुख, चिमन डांगे, सुरेश पाटील, तानाजीराव पाटील, एस. बी. पाटील, महेंद्र लाड, राहुल महाडीक, सरदार पाटील, वैभव शिंदे, बाळासो होनमोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने, विरोधी पक्ष नेते, संजय मेंढे, डी. डी. चौगुले, नगरसेवक तौफिक शिकलगार, मयुर पाटील, मंगेश चव्हाण, लक्ष्मण नवलाई, स्वाती पारधी, रवी वळवडे, सुभाष खोत, आप्पासाहेब पाटील, नाना घोरपडे, अजय देशमुख, रवि खराडे, सचीदानंद कदम, अल्ताफ पेंढारी, अकबर मोमीन, विजय कदम, विजय आवळे, शितल सदलगे, दिलीप पाटील, महाबळेश्वर चौगुले, अमित पारेकर, सुभाष खोत, आर. बी. पाटील,

अरूण पळसुले, महावीर पाटील, सनी धोतरे, आयुब निशानदार, देशभुषण पाटील, अकबर मोमीन, अशोकसिंग रजपुत, आशिष चौधरी, अजित ढोले, पैगंबर शेख, नामदेव पठाडे, सचिन पाटील, अरविंद पाटील, गजानन मिरजे, अख्तर अत्तार, जहीर मुजावर, तेजस धुळुबुळु, विजय आवळे, अनिल माने,

विठ्ठलराव काळे, शमशादबी नायकवडी, श्रीधर बारट्टके, पोपाट पाटील, सुभाष पट्टनशेटी, प्रताप चव्हाण, जोशी, शिवाजीराव सांवंत, श्वेता शेठ, जन्नतबी नायकवडी, विश्वासराव यादव, नासीर चौगुले, अरविंद जैनापुरे, सचिन पाटील, अमोल पाटील, तोडकर, याकूब मनेर, ताजोद्दीन शेख, दिगंबर पाटील, अशोक रासकर, सोहेल बलबंड, पी एल कांबळे, राहुल पाटील, प्रशांत चव्हाण, रामचंद्र पवार, रफिक शेख, आदि मान्यवरही उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments