Thursday, April 25, 2024
Homeराजकीयब्रिटिशांना हादरवून सोडलेल्या सांगलीतील जेल फोडो आंदोलनातील क्रांतीकारकांना अभिवादन - काँग्रेस पक्ष...

ब्रिटिशांना हादरवून सोडलेल्या सांगलीतील जेल फोडो आंदोलनातील क्रांतीकारकांना अभिवादन – काँग्रेस पक्ष वसंतदादा सेवा प्रतिष्ठान आणि ब्रँड सांगलीचा उपक्रम…

Share

सांगली – ज्योती मोरे

आज 24 जुलै 2022 बरोबर 79 वर्षापूर्वी याच दिवशी म्हणजे 24 जुलै 1943 रोजी ब्रिटिशांच्या कैदेत असणाऱ्या सांगलीतील क्रांतिकारकांनी जेल फोडून त्याच्या ताटावरून उड्या मारून खंदक पार करून पलाईन केलं होतं हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. या सोळाही क्रांतिकारकांना आज जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांच्यासह त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं.

या 16 ही स्वातंत्र्य सैनिकांच्या उत्तराधिकाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं, त्याचबरोबर ब्रँड सांगली च्या वतीने जेल फोडून आंदोलनाची माहिती देणाऱ्या एका फलकाच अनावरणही यावेळी करण्यात आलं. काँग्रेस पक्ष वसंत दादा सेवा प्रतिष्ठान आणि ब्रँड सांगलीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे प्रभारी श्रीयुत बानुगडे, नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: