Homeमनोरंजनअनेक पुरस्कार महोत्सवांमध्ये संदीप पाठक यांचा बोलबाला, या वर्षी ३ पुरस्काराची हॅट्ट्रिक...!

अनेक पुरस्कार महोत्सवांमध्ये संदीप पाठक यांचा बोलबाला, या वर्षी ३ पुरस्काराची हॅट्ट्रिक…!

गणेश तळेकर

विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकाही चपखलप णे साकरीत चतुरस्त्र अभिनेते संदीप पाठक यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वेगवेगळया धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांना कायमच आनंद दिला आहे. सध्या विविध पुरस्कार महोत्सवांमध्ये संदीप पाठक हे नाव चांगलच गाजतंय.

जागतिक किर्तीच्या ‘काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२’ (Couch Film Festival Spring 2022 )मध्ये ‘राख’ चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवल्यानंतर त्यांची पुरस्कारांची घोडदैाड सुरूच आहे. त्यानंतर नुकत्याच संपन्न झालेल्या ‘अंबरनाथ चित्रपट महोत्सव २०२२’ मध्येही याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना मिळाला. तसेच ‘सांस्कृतिक कलादर्पण २०२२’ या महोत्सवातही त्यांनी पुरस्कार पटकवत यशाची अनोखी हॅट्रिक साधली आहे.

या तीन लोकप्रिय महोत्सवांमध्ये ‘राख’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवत संदीप यांनी यंदा सर्वत्र आपला डंका वाजवला आहे. याबद्दल बोलताना संदीप पाठक सांगतात की, यंदाचं वर्ष माझ्यासाठी ख़ास आहे.

कौतुकाची थाप माझा आनंद व हुरूप वाढवणारी असून माझा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून आमच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमची ही मेहनत आहे. मला भविष्यातही अनेक उत्तम चित्रपट करायचे आहेत. एक अभिनेता म्हणून प्रेक्षकांना जे आवडेल ते देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. लवकरच माझे आणखी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्यातील विविधांगी भूमिका सुद्धा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments