Homeराज्यसांगली भाजपा तर्फे राज्यसभा निवडणुकीतील विजयाबद्दल जल्लोष साजरा...

सांगली भाजपा तर्फे राज्यसभा निवडणुकीतील विजयाबद्दल जल्लोष साजरा…

सांगली – ज्योती मोरे

राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या राज्यसभा निवडणुकीत विजयी झालेले मा.पियुष गोयल, मा.अनिल बोंडे व मा. धनंजय महाडिक यांच्या विजयाचा जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी करून साखर व पेढे वाटून आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय समोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

तिन्ही उमेदवारांनी यश मिळवत आपल्या विजयाचं नाणं खणखणीत वाजवून दाखवलंय. उत्तम नियोजनाने विजय खेचून आणण्याची ताकद काय असते हे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील व विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात भाजपाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय असे मत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, संघटक सरचिटणीस दीपक माने, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक प्रकाश ढंग, लक्ष्मण नवलाई, सुब्रावतात्या मद्रासी, नगरसेविका कल्पनाताई कोळेकर, गीतांजली पाटील,

सांगली प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, अल्पसंख्यांक प्रदेश चिटणीस अश्रफ वांकर, सरचिटणीस केदार खाडिलकर अविनाश मोहिते सचिव विश्वजीत पाटील, भालचंद्र साठे, श्रीकांत वाघमोडे, प्रफुल्ल ठोकळे, प्रियानंद कांबळे, अमित गडदे, धनेश कातगडे, प्रकाश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments