Homeराज्यसांगली जिल्हा पोलीस दल मोटार परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने...

सांगली जिल्हा पोलीस दल मोटार परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने वाहन चालक दिन साजरा…

सांगली – ज्योती मोरे

सांगली जिल्हा पोलीस दल मोटार परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन चालक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, मोटार वाहन निरीक्षक रमेश पाटील, सांगली जिल्हा वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष महेश पाटील, मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन दंताळ, मोटार परिवहन विभागातील सर्व कर्मचारी, चालक, अंमलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आज पार पडला.

Sangli District Police

सदर कार्यक्रमात पोलीस वाहन चालक, रुग्णवाहिका चालक, पेट्रोल वाहतूक चालक, जिल्ह्यातील पहिल्या महिला रिक्षाचालक, मालवाहतूक चालक यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याबरोबरच अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले,वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, मोटार वाहन निरीक्षक रमेश पाटील यांनी सर्व उपस्थित चालकांना मार्गदर्शन केले.

Sangli District Police Force

शिवाय वाहन चालवताना नजर चांगली असणे फार महत्त्वाचे असल्याने डॉक्टर अनिल कुलकर्णी आय हॉस्पिटल मिरज यांच्यावतीने चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहाय्यक पोलीस फौजदार सुनील राऊत सहाय्यक पोलीस फौजदार व्हीपी कोठावळे पोलीस हवालदार शंकर भिंगारदिवे पोलीस हवालदार राजेंद्र हसबे पोलीस हवालदार अनिल लांडगे यांनी मोलाची भूमिका पार पाडली तर सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक माळी यांनी सूत्रसंचालन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments