HomeBreaking Newsधक्कादायक | एकाच कुटुंबातील ९ जणांनी विषारी औषध प्राशन करून संपवले जिवन…!...

धक्कादायक | एकाच कुटुंबातील ९ जणांनी विषारी औषध प्राशन करून संपवले जिवन…! सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील घटना…

सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.
मिरज तालुक्यातील म्हैसाळ या गावी राहत असलेल्या डॉक्टर माणिक यल्लाप्पा वनमोरे यांच्या कुटुंबातील आठ ते नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नाही.घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलिस व ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.या घटनेमुळे संपूर्ण मिरज तालुक्यात आणि सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणामुळे सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. आत्महत्या केलेल्या मध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे वय वर्षे ५२,संगीता पोपट वनमोरे वय वर्ष २८, अर्चना पोपट वनमोरे वय वर्षे ३०,शुभम पोपट वनमोरे वय वर्षे २८,माणिक यल्लाप्पा वनमोरे वय वर्षे ४९,रेखा माणिक वनमोरे वय वर्षे ४५,आदित्य माणिक वनमोरे वय वर्षे १५,अनिता माणिक वनमोरे वय वर्षे २८,आणि आक्काताई वनमोरे वय वर्षे ७२ अशा नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

घटनास्थळीवरुन मिळालेली माहिती अशी की म्हैसाळ येथील नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका नगर चौक अलगत डॉक्टर वनमोरे कुटुंब राहत होते. अंबिका नगर मध्ये या कुटुंबाचे अजून एक घर आहे. आज सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता. आसपासच्या शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिले असता. एकाच घरात सहा जणांनी विष घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. तर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह आढळून आले.

एकाच कुटुंबातील नोकरणी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले. येथील रहिवाशांनी मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती दिली आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments