Tuesday, April 16, 2024
Homeगुन्हेगारीसांगली | चोर समजून साधूंना मारहाण करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात...जत...

सांगली | चोर समजून साधूंना मारहाण करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात…जत तालुक्यातील लवंगा गावातील घटना…पाहा Viral Video

Share

सांगली – ज्योती मोरे

सांगली-13 सप्टेंबर रोजी जत तालुक्यातील लवंगा गावात तीर्थयात्रेदरम्यान मलकारसिद्ध मंदिरात थांबलेल्या नेमचंदनाथ गोसावी, राजू गोसावी, पप्पू गोसावी, प्रेम शंकर या साधूंना चोर समजून गावातील आमसिद्ध तुकाराम सरगर, लहू रकामी लोखंडे, नागराज पवार, सागर शिवाजी तांबे, रमेश सुरेश कोळी, सचिन बसगोंडा बिराजदार आणि शिवाजी सिदराम सरगर या सात जणांनी जोरदार मारहाण करत त्यांना जखमी केलं, व त्यानंतर त्यांना पकडून ठेवले होते.

सदर घटनेची माहिती गावातील सरपंचांनी उमदी पोलिसांना कळवून पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तक्रार देण्यास सांगितले असतानाही साधुनी लांबचा प्रवास असल्याचे सांगून तक्रारीस नकार दिला.

दरम्यान सदर घटनेची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना कळविल्यानंतर त्यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश उमदी पोलिसांना दिले. त्याप्रमाणे उमदी पोलिसांनी या सात जणांवर भादविक 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सामील असणाऱ्या आणखी काही जणांची चौकशी सुरू असून त्यांनाही ताब्यात घेतले जाणार आहे.

सदर घटनास्थळास पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, जत उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट देऊन सूचना दिल्या आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज पवार हे करत आहेत.

Viral Video- from Social Media

Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: