Homeराज्यअखेर संजय चा मृतदेह मिळाला, चिचाळा जवळील सांड नदीच्या पुरात गेला होता...

अखेर संजय चा मृतदेह मिळाला, चिचाळा जवळील सांड नदीच्या पुरात गेला होता वाहुन…

नगरधन – चिचाळा रस्त्यावरील पुलावरची ४ सप्टेंबरची घटना

रामटेक – राजू कापसे

दि. ४ सप्टेंबर ला आलेल्या मुसळधार पावसामुळे सांड नदीला पुर येऊन नगरधन – चिचाळा मार्गावरील पुलावरून वाहत असलेल्या पुरात चिचाळा येथील इसम वाहुन गेल्याची घटना घडली होती. मात्र मृतदेह मिळुन आलेला नव्हता.

सवीस्तर वृत्तानुसार, दि. ४ सप्टेंबर रविवार ला परिसरात मुसळधार पाऊस बरसला. यामुळे सांड नदीला पुर येऊन नगरधन – चिचाळा मार्गावरील सांड नदीच्या पुलावरून पाणि वाहून चालले होते. दरम्यान चिचाळा येथील रहीवाशी असलेला ३२ वर्षीय युवक संजय नागोराव नागपुरे हा नगरधनहुन चिचाळा कडे जात होता. यावेळी नदीवरच्या पुलावरुन पाणि वाहात होते. दरम्यान संजय हा पायदळ नदीचा पुल पार करतांना त्याचा तोल जाऊन तो वाहुन गेला होता.

दरम्यान शोधकार्यादरम्यान रविवारी संजय चा मृतदेह मिळुन आला नाही. तेव्हा आज सकाळपासुनच चिचाळा येथील काही मच्छामारांनी मृतदेहाची शोधाशोध केली असता दुपारी २ वाजता दरम्यान संजय चा मृतदेह पुलापासुन जवळपास २०० मिटर अंतरावर एका झुडपामध्ये अडकल्याचा आढळुन आला. लगेच रामटेक पोलिसांना माहीती देण्यात आली. रामटेक पोलिसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला व मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथील शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments