Homeराज्यआदीवासी भाडेपट्टा संदर्भात संतोष शेंडेची सुनावणी सुरु...

आदीवासी भाडेपट्टा संदर्भात संतोष शेंडेची सुनावणी सुरु…

संजय आठवले – आकोट

आकोट तालुक्यातील मौजे गाजीपूर येथिल आदिवासी शेतकरी महिलेच्या शेताचा भाडेपट्टा जिल्हाधिकारी अकोला यांचे परवानगीविना केल्याबाबत झालेल्या तक्रारीवरुन आकोट तहसिलदार यांनी स्टोनक्रशरधारक संतोष शेंडे यांची चौकशी सुरु केली आहे. ह्या चौकशी दरम्यान दोन सुनावण्या झाल्या आहेत.

आदीवासींची कोणत्याही रितीने नाडवणूक व पिळवणूक होऊ नये, त्यांचे जमिनीवर कुणी कब्जा करु नये यासाठी आदीवासी जमिनीबाबत कोणताही व्यवहार करणेपूर्वी स्थानिक जिल्हाधिकारी यांची परवानगी घेण्याचे बंधन शासनाने घातलेले आहे. असे असताना स्टोन क्रशरधारक संतोष शेंडे यानी आकोट तालुक्यातील मौजे गाजीपुर येथिल आदीवासी महिलेचे शेत स. क्र. ३२/१ चा भाडेपट्टा केला. १०० रुपये मुल्याच्या मुद्रांकावर हा भाडेपट्टा केला.

आणि तो महसुल विभागापासुन दडवून ठेवला. ह्याप्रकरणी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचेकडे तक्रार करण्यात आली. त्यावर त्यानी तहसिलदार आकोट ह्याना ह्या संदर्भात चौकशीचे आदेश दिले. त्या आदेशान्वये या भाडेपट्ट्याबाबत आकोट तहसिलदार निलेश मडके यानी चौकशी सुरु केली आहे. त्या अनुषंगाने दि.६ जुन रोजी प्रथम सुनावणी घेण्यात आली. या सुनावणी समयी संतोष शेंडे गैरहजर होते. मात्र तक्रारदार ऊपस्थित होता. त्याने ह्यावेळी आपला लिखीत जबाबही दाखल केला.

त्यानंतर दुसरी सुनावणी दि.१५ जून रोजी घेण्यात आली. यावेळी तक्रारदार व बिनतक्रारदार हे दोघेही ऊपस्थित होते. शेंडे यानी आपला जबाब दाखल करणेकरिता आवधी मागुन घेतला. तेंव्हा या प्रकरणाशी संबंधिताना हजर ठेवण्याकरिता व शेंडेला आपला जबाब दाखल करण्या करिता तिसरी सुनावणी दि.२७ जुन रोजी ठेवण्यात आली आहे.

ह्या संदर्भात आपण महाव्हाईसला “मॅनेज” केले आहे. त्याना खिशात घातले आहे. अशा प्रकारच्या बाजारु गप्पा काही सडकछाप लोकांकडून करण्यात येत आहेत. त्यामूळे संतोष शेंडेबाबत काही माहीती असल्यास जी जनहितार्थ अथवा भ्रष्ट प्रवृत्तीस आळा घालण्याचे दृष्टीने प्रकाशित होणे गरजेचे आहे अशी माहिती पुराव्यासकट महाव्हाईसकडे द्यावी. असे नसेल तर बाजारगप्पाना आवर घालावा असे आवाहन महाव्हाईसने केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments