Homeराज्यसांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक पदी सतीश शिंदे यांची नियुक्ती ...

सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक पदी सतीश शिंदे यांची नियुक्ती …

सांगली – ज्योती मोरे

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक नुकतेच रुजू झालेले अजय सिंदकर यांची बदली कोल्हापूर येथे झाल्याने या पदावर आता सतीश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतचे आदेश काढले असून पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्याकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा पदभार देण्यात आला आहे.

यापूर्वी सतीश शिंदे हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेकडे कार्यरत होते. त्यानंतर त्यांना शहर पोलीस ठाण्याचाही पदभार देण्यात आला होता. आदेश मिळतात सतीश शिंदे यांनी गुन्हे अन्वेषण चा पदभार स्वीकारला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments