Saturday, April 20, 2024
Homeगुन्हेगारीसांगलीतील सेवासदन हॉस्पिटलला तब्बल 18 लाख 63 हजार 750 रुपयांचा दंड...महाराष्ट्र प्रदूषण...

सांगलीतील सेवासदन हॉस्पिटलला तब्बल 18 लाख 63 हजार 750 रुपयांचा दंड…महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई

Share

सांगली प्रतिनिधी :– ज्योती मोरे
सांगलीतील सेवासदन हॉस्पिटलला हॉस्पिटल सुरू केल्यापासून प्रक्रिया न केलेले सांडपाणी महापालिकेच्या नाल्यात सोडणे बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकणे यासह इतर कारणांमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तब्बल 18 लाख 63 हजार 750 रुपयांचा दंड ठोठावलाय.

शिवसेनेचे सांगली शहर प्रमुख मयूर घोडके यांनी या विरोधात आवाज उठवून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. याशिवाय सदर हॉस्पिटलच्या पार्किंगसाठीच्या जागेत हॉस्पिटल प्रशासनाने विविध विभाग सुरू करून यामध्ये अनाधिकृत बांधकाम केल्याबाबतही महापालिकेकडे तक्रार केली होती. महापालिकेने सदर विभाग सील करण्याचे आदेश देऊनही, तळघरात हे विभाग चालू असल्याने, याबाबतीतही मुंबई हायकोर्टात वकील नेमण्यात आल्याची माहिती, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

दरम्यान कोरोनाच्या काळामध्ये ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजना लागू होती त्या सर्व हॉस्पिटलच्या कडून कोरोना काळात योजनेतून उपचार घेतलेल्या रुग्णांची यादी मागून त्या त्या रुग्णांशी संपर्क करून, कोरोना उपचारासाठी हॉस्पिटलनेही पैसे घेतले का? याबाबतीत तपासणी करणार असून, जर तसे केल्याचे आढळल्यास सदर हॉस्पिटलची एकही काच शिल्लक राहणार नाही. असा इशाराही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिला आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: