Homeराजकीयशहीद स्मारक तरुणांसाठी प्रेरणा देईल...आमदार सुधीरदादा गाडगीळ

शहीद स्मारक तरुणांसाठी प्रेरणा देईल…आमदार सुधीरदादा गाडगीळ

सांगली प्रतिनिधी:–ज्योती मोरे.

देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. या शहिदांची सदैव आठवण राहण्यासाठी जिल्ह्यातील पहिले शहीद स्मारक आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून व संकल्पनेतून त्रिकोणी बागेजवळ शहीद स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शहीद स्मारका जवळ राष्ट्रध्वज फडकवण्यात आला तसेच १५८ शहीद नावाची माहितीचा फलक येथे लावण्यात आला असून त्यापेकी उपस्थित कुटुंबीयांचे सत्कार हि करण्यात आले.

शहीद स्मारकाचे उद्घाटन एअर कमांडर दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कमांडर पाटील यांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी हि उपस्थित होते, ते म्हणाले, पुढील हे स्मारक तरुण पिढीला प्रेरणा देईल.याद्वारे देशभक्तीची प्रेरणा मिळेल. सैनिकांच्या शौर्याला सलाम देवून स्मारकाजवळ ३६५ दिवस अखंड अमरज्योत तेवत राहावी अशी कल्पना मनोगतातून व्यक्त केली. कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी लाभलेल्या भारतीय माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती मीनाक्षीताई स्मारकाबाबत दादांच्या या कार्याची महती सर्वांसमोर मांडली.

सैनिक कुटुंबाची शौर्यगाथा व त्याग याची व्यथा व्यक्त केली. तसेच मनपा आयुक्त सुनील पवार यांही स्मारकाच्या मेंटेनन्सबाबत महानगरपालिकेच्या माध्यमातून होणारी मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच सर्व नागरिकांनाही याभूमीचे पावित्र्य जपावे असा कानमंत्र दिला. आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी ७ वर्षात भरपूर विकास कामे केली त्यामधील सर्वात मोठे व महत्वपूर्ण काम म्हणजे शहीद स्मारकाची उभारणी. जे स्मारक आपल्याला शहिदांच्या वीरमरणाची आठवण कायम करून देणार आहे. असे शेखर इनामदार म्हणाले.

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी या शहीद स्मारक ठिकाणी अमर जवान ज्योत पुढील काळात लावण्यात येईल असे शहीद कुटुंबीयांना आश्वस्त केले. तसेच ECHS, माजी सैनिक संकुलातील माजी सैनिकांच्या हॉस्पिटलचे नवीन बांधकाम पूर्णत्वास नेण्याबाबतची ग्वाही देवून. माजी सैनिकांच्या सर्व अडचणीवर तोडगा काढण्याबाबत सर्व माजी सैनिकांना शब्द देवून आपण त्याच्यासोबत आहोत हा मोठा आधार दिला. स्वातंत्र्यलढ्याला शहिदांचा मोठा इतिहास भावी पिढीला माहिती होणे गरजेचे आहे. असे ते बोलत होते.

यावेळी सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, एअर कमांडर दीपक पाटील, भारतीय माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षा मीनाक्षी खोत, माजी महापौर संगीता खोत, माजी उपमहापौर गीता सुतार , युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, महिला मोर्चा अध्यक्षा स्वातीताई शिंदे, गटनेते विनायक सिंहासने, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, नगरसेविका कल्पना कोळेकर, महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील, गणपती साळुंखे, अमित गडदे, सदाशिव पाटील, राहुल ढोपे पाटील, कृष्णा राठोड, अमित देसाई, आर्किटेक्ट समीर गोखले, हर्षद पाटील, सारंग साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, अमर नलवडे, मुजावर व क्षीरसागर साहेब, उपायुक्त राहुल रोकडे, तसेच शहीद स्मारक उदघाटन नियोजन आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंचचे विश्वजीत पाटील, भारतीय माजी सैनिक संघटनेचे कॅप्टन लक्ष्मण शिंदे, सुभेदार नंदकिशोर, कर्नल कल्याणी, कर्नल हारगुडे, ग्रुप कॅप्टन वाळवणकर, के.वी. गायकवाड, नारायण शिंदे, एम.पी. शिंदे, कॅप्टन अशोक कुंभार, सुभेदार साळुंखे, सुभेदार भोसले, लेफ्टनंट सलीम मुजावर, सुभेदार मेजर रमेश चव्हाण, संपतराव कांबळे तसेच सांगली जिल्ह्यातील शहीद कुटुंबीय व नागरिक उपस्थित होते.

तसेच आजी – माजी सैनिक उपस्थित होते, यावेळी स्मारका जवळ राष्ट्रध्वज फडकवण्यात आला व शहीद झालेल्या कुटुंबियांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय माजी सैनिक संघटना सचिव रमेश चव्हाण यांनी केले. आभार माजी महापौर संगीताताई खोत यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता चव्हाण यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments