Thursday, April 25, 2024
Homeराज्यरामटेक येथे मुस्लीम बांधवांतर्फे सालाना उर्स व शाही संदल चे थाटात आयोजन,...

रामटेक येथे मुस्लीम बांधवांतर्फे सालाना उर्स व शाही संदल चे थाटात आयोजन, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसेंची उपस्थिती…

Share

रामटेक – राजू कापसे

हजरत बाबा इस्माईल शाह दरगाह, हजरत बाबा कमाल शाह फनी दरगाह रामटेकच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी काल दिनांक २२ सप्टेंबर रोज गुरुवारला गांधी चौक रामटेक येथे सालाना उर्स व शाही संदल चे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी भेट देत सालाना उर्स मध्ये सहभागी झाले व हजरत बाबा इस्माईल शाह दरगाह येथे जाऊन माथा टेकला. यावेळी मुस्लिम समाज बांधव व हजरत बाबा इस्माईल शाह दरगाह यांचे वतीने चौकसेंचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थितांमध्ये पी.टी. रघुवंशी, नितिन भैसारे, राजू कुरैशी, डॉ. कलाम फारूकी, सलीम मालाधारी, नासीर शैख़, इरशाद पठान, आरिफ मालाधारी, मोहन कोठेकर, चंद्रभान शिवरकर, रुपेश जांभुलकर, नाशीर बाबा (पारशिवनी), जाकिर कुरैशी, मूसाहित अगवानी, हाशिम कुरैशी, जाकिर मालाधारी, फिरोज मालाधारी, व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: