HomeMarathi News Todayअमरावती शहरात पुन्हा गोळीबार...अकोल्याच्या कुख्यात आरोपीला फिल्मी स्टाईलने केले जेरबंद...

अमरावती शहरात पुन्हा गोळीबार…अकोल्याच्या कुख्यात आरोपीला फिल्मी स्टाईलने केले जेरबंद…

कुख्यात आरोपींने पोलिसांवर रोखली रिव्हॉल्व्हर

अमरावती – अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने चित्रपटातील एखाद्या सीन प्रमाणे आरोपीचा पाठलाग करून त्याला जेरबंद केल्याची घटना अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मीनगरात घडली आहे. पकडण्यात आलेला आरोपी हा अकोला येथील असून त्याचे नाव राजेश सुभाष राऊत असे आहे.

अकोला येथून पळत अमरावतीत आला त्याचा पाठलाग अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत होते, दरम्यान अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मीनगरात आरोपीने त्याला पकडत असतांना त्याने थेट पोलीसावर रिव्हॉल्व्हर रोखली व तो पळून जात होता दरम्यान पोलिसांनी आरोपीच्या गाडीच्या टायरवर गोळीबार केला त्यामुळे आरोपीची चार चाकी अनियंत्रित झाली व गाडी थेट एका इलेट्रीक पोलला धडकली, त्यामुळे पोलिसांनी लागलीच आरोपीला ताब्यात घेऊन गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये आणले आहे.

आरोपी राजेश सुभाष राऊत मूळ रहिवासी अकोला गजानन नगर जुना अकोला आरोपीचा पाठलाग अकोला गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी करीत होते बुलढाण्यापासून आरोपीचा पाठलाग सतत अमरावती लक्ष्मी नगर पर्यंत पाठलाग केला,अकोला गुन्हा शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी राऊतला पकडण्यात यशस्वी झाले, पुढील तपास अकोला पोलीस व अमरावती गाडगे नगर हद्दीमध्ये झाल्यामुळे गाडगे नगर पोलीस घटनेचा पूर्ण तपास करीत आहे, आरोपीवर अकोला व अनेक जिल्ह्यांमध्ये 25 ते 30 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments