Wednesday, April 24, 2024
Homeराज्यश्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळ्याची हजारोंच्या उपस्थितीत भव्य दिंडीने सांगता...

श्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळ्याची हजारोंच्या उपस्थितीत भव्य दिंडीने सांगता…

Share

सांगली – ज्योती मोरे

सांगलीतील नेमिनाथ नगर मध्ये कल्पदृंग ग्राउंड वर गेल्या चार जानेवारीपासून सुरू असलेला श्री राम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक पद्धतीने साजरा करण्यात आला. आज या सोहळ्याची प.पू. ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि भव्य दिंडीने सांगता करण्यात आली.

यामध्ये पारंपारिक वेशभूषेत हजारो भक्त सहभागी झाले होते. कल्पतरूम ग्राउंड, राजमती नेमगोंडा पाटील हायस्कूल, विश्रामबाग गणपती मंदिर, शंभर फुटी मार्गे, धामणी रोड वरून पुन्हा ही दिंडी कल्पद्रुम ग्राउंड वर आली. त्यानंतर दिंडीमधील श्री श्री क्षेत्र तेर जिल्हा उस्मानाबाद मधील श्री वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांनी जय जय राम कृष्ण हरी चा गजर करत वातावरण भक्तिमय करून टाकले.

दरम्यान आजच्या काल्याच्या कीर्तनासाठी पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनीही हजेरी लावली. शिवाय काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते जितेश कदम, माजी आमदार नितीन शिंदे, यांनीही उपस्थित राहत,गळ्यात टाळ घेऊन वारकऱ्यांसोबत ठेका धरला.

श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनीही दिंडीत सहभाग नोंदवला. सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहरजी सारडा यांच्यासह समस्त सोहळा समितीमधील प्रत्येक कमिटीच्या सदस्यांनी जीव ओतून काम करत सदर सोहळा यशस्वी करून दाखवला. दिंडी नंतर उपस्थित भक्तांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. सदर महाप्रसादाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: