आकोट येथील श्री सरस्वती शैक्षणिक संकुल द्वारा संचालित श्री सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेत उत्तुंग भरारी घेऊन शाळेच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
विविध सामाजिक उपक्रमात व शैक्षणिक कार्यात सदा अग्रेसर असलेल्या आकोट तालुक्यातील श्री सरस्वती विद्यालयाचा निकाल ९४.८३% लागला असून गुणानुक्रमे प्रथम कु.राखी गोपाल माकोडे ९१.४०%, द्वितीय संजय गोपाल धर्मे ८९.४०%, तृतीय कु.दीपिका एकनाथ जाधव ८८.४०%, चतुर्थ कु. वंदना मोरेश्वर चिरडे ८७.४०% व कु.उत्कर्षा गजानन कुंभारी ८७.४०%, तर पाचवा क्रमांक कु.श्रेया मुकुंद मडावी ८४.८०% गुण प्राप्त करून शाळेचा लौकीक कायम ठेवला आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीबरोबर शिक्षकांनी कोरोना काळात आँनलाईन अभ्यास, अतिरिक्त वर्ग, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शंकासमाधान व विज्ञानाचे भरपूर प्रयोग शाळेच्या समृध्द विज्ञान प्रयोगशाळेत घेऊन यशस्वी विद्यार्थी घडविले आहेत. देशाचे चांगले नागरिक घडविण्याचा संकल्प घेऊन शाळेचे मुख्याध्यापक भूषण ठाकूर, पर्यवेक्षिका कु.संगीता धर्मे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे व भविष्यात यापेक्षाही जास्त यश विद्यार्थ्यांना प्राप्त करुन देण्याचे ध्येय गाठणार असा निर्धार व्यक्त केला आहे.