Homeगुन्हेगारीनरखेड | पहेलवानाचा गोळी घालून खून केल्याची सैनिकाची कबुली सहा राउंड च्या...

नरखेड | पहेलवानाचा गोळी घालून खून केल्याची सैनिकाची कबुली सहा राउंड च्या माऊझरचा केला वापर…

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड तालुक्यातील बेलोना येथील केशव बाबुराव मस्के ( पहेलवान) याचा सहा राउंड च्या माऊझर मधून गोळी झाडून खून केल्याची कबुली संशयित आरोपी सैनिक भारत कळंबे वय ३० वर्षे रा बेलोना यानी दिली. त्याच्या विरुद्ध भा द वी ३२५, ३४ व आर्म ऍक्ट २५(३) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपीस प्रथम श्रेणी न्यायालयात पेश केले असता१६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे.

त्याला खुनात मदत केल्याच्या संशयावरून निलेश जाधव वय २९ व जगदीश कठाणे वय २७ दोघेही रा. मोवाड याना ताब्यात घेण्यात आले आहे. हा खून कट रचून करण्यात आला आहे असा पोलिसांना संशय असून आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.काल सोमवार ला सायंकाळी ५.३० वाजता भारत कळंबे , निलेश जाधव व जगदिश कठाणे या तिघांनी निलेश जाधव च्या मोवाड येथील हेअर कटिंग सलून मध्ये बसून ६.३० पर्यंत दारू ढोसली.

नंतर जगदिश कठाणेच्या मोटारसायकल नि जगदीश व भारत बेलोण्याला आले. मृत केशव पहेलवान हा दररोज सायंकाळी ६.४५ ते ७ च्या दरम्यान शेतातून दूध घेऊन येतो याची माहिती आरोपीला होती. मृताचा शेतातून परत येण्याचा रस्ता हा आरोपीच्या घरासमोरून आहे. मृताचा मागोवा घेऊन तो बस स्टँड पासून काही अंतरावर येताच आरोपीने अंधाराचा फायदा घेऊन मागच्या बाजुने मेंदूत सहा राउंड च्या माऊझर ने एक गोळी झाडली. अंधाराचा फायदा घेऊन आरोपीने मोवाडच्या दिशेने पलायन केले.

घटनेचे लागेबांधे तीन वर्षांपूर्वी मृतक केशव याच्या शेतात काम करणाऱ्या एक आदिवासी मुली च्या अत्याचाराच्या मुळाशी आहेत. आरोपीचा मोठा भाऊ प्रेमराज कळंबे त्या प्रकरणात आरोपी असून न्यायालयीन कोठडीत आहे. त्या केसची सूनवाई सुरू असून त्या प्रकरणात तडजोड करण्याकरिता मृतकावर कळंबे कुटुंब व त्यांच्या आप्तस्वकीयकडून अत्याचारित आदिवासी कुटुंब व मृतकावर दबाव दिल्या जात होता.

मृतकाच्या मुलाला प्रेमदास च्या ४ वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी अडकवण्यात आले होते त्यामुळे मृतक तडजोड करण्यास तयार नव्हता. शनिवारी गावच्या प्रतिष्ठित नागरिकांची यासंबधी बैठक झाली परंतु तोडगा निघाला नाही . तेंव्हा तिथेच आरोपी भारत कळंबे याने आदीवासी महिला व मृत केशव मस्के याना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत आदिवासी महिला व केशव यांनी पोलिसांकडे तक्रार ही दिली होती. यापूर्वीही आरोपी व आरोपीच्या नातेवाईकांनी मृतकाला धमकवल्याची माहिती आहे.

गावकऱ्यांचा पोलिसांवर रोष जीवे मारण्याची धमकी देऊनही तसेच प्रकरणाची पोलिसांना कल्पना असूनही काहीच कारवाई न केल्यामुळेच आरोपीची हिम्मत वाढून त्याने खून केला. हा खून कट रचून केला आहे. या कटात सामील सर्वाना हुडकून अटक करावी.

तसेच पीडित आदिवासी कुटुंब व मृतकाच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. या मागणीसाठी बेलोनावासीयांनी भाजप नेते उकेश चौहान यांच्या मार्गदर्शनात नरखेड पोलीस स्टेशन समोर ठिय्या दिला. संतप्त जमावाला पोलीस उपविभागीय अधिकारी नागेश जाधव यांनी शांत करून परत पाठविले.

आरोपीच्या कुटुंबाला सरंक्षण – आरोपी विरुद्ध असलेल्या असंतोषामुळे त्याच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आले असून नरखेड, काटोल, जलालखेडा, कोंढाली व अतिरिक्त पोलीसाचा बंदोबस्त बेलोना गावात तैनात करण्यात आहे.गावात तणावपूर्ण शांतता आहे. मृताचे पोस्टमार्टेम नागपूर ला मृतकाचा मृत्यू गोळी लागून झाल्यामुळे पोस्टमार्टेम व फॉरेन्सिक चाचणी करिता प्रेत नागपूरला नेण्यात आले असून बातमी लिही पर्यंत अंत्यसंस्कार झाला नव्हता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments