Thursday, April 25, 2024
Homeगुन्हेगारीकासरळीत मुलाने केला बापाचा खून...आईच्या फिर्यादिवरून मुलास अटक...

कासरळीत मुलाने केला बापाचा खून…आईच्या फिर्यादिवरून मुलास अटक…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

बिलोली तालुक्यातील कासराळी येथे मुलाने चक्क जन्मदात्या वडिलांचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची घडली 29 सप्टेंबर रोजी रात्री घडली असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिलोली तालुक्यातील कासराळी येथील लालू पिराजी इंगळे वय (60) आपल्या घरी जेवण केल्यानंतर सुनेला ताट उचलण्यास सांगिलते परंतु सुनेने ताट न उचलण्याने शिवीगाळ केली. पत्नीस शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून मुलगा प्रकाश लालू इंगळे वय(35) याने घरातील कुऱ्हाड घेऊन वडिलांचा पायावर घाव केला.

यातच वडील लालू इंगळे यांच्या पायात मार लागल्यामुळे रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी मयताची पत्नीने दिलेल्या फिर्यादिवरून आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ए.पी आय.केंद्रे हे करित आहेत.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: