HomeMarathi News Todayस्मृती इराणींवर सोनिया गांधी भडकल्या…दोघांमध्ये जोरदार बाचाबाची…

स्मृती इराणींवर सोनिया गांधी भडकल्या…दोघांमध्ये जोरदार बाचाबाची…

संसदेतील स्मृती इराणी आणि कॉंग्रेस मधील वाद आता संसदेबाहेर आला आहे. तर संसदेत आज स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसला चांगलेच धारेवर धरत सोनिया गांधी यांचावर आपला रोष व्यक्त केला केला, यावेळी त्यांचा कॉंग्रेस वर आपला वयक्तिक राग दिसून येत होता.

तर काँग्रेसचे खासदार अधीर रंजन यांनी देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी केलेल्या अशोभनीय वक्तव्यानंतर आज संसदेत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार बाचाबाची झाली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया गांधींनी माफी मागावी अशी मागणी करत असतानाच काँग्रेसच्या खासदारांनीही गदारोळ सुरू केला.

सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात जोरदार वादावादी झाली तेव्हा या सगळ्यातील वाद वाढला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनियांनी स्मृती यांना डोंट टॉक टू मी ,म्हटले. सोनियांनी हे सांगताच स्मृतीही रागाने लाल झाल्या आणि दोन्ही बाजूंनी जोरदार बाचाबाची झाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकसभेच्या कामकाजादरम्यान भाजपचे सर्व खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ‘सोनिया गांधी माफी मागा’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब झाले तेव्हा सोनिया गांधी बाहेर जात होत्या, मात्र घोषणाबाजीतच सोनिया गांधी पुन्हा रमादेवी यांच्याकडे आल्या आणि म्हणाल्या की, माझे नाव का घेतले जात आहे, अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली आहे.

दरम्यान, रमादेवीजवळ उभ्या असलेल्या स्मृती इराणी यांनी सोनिया गांधींना सांगितले की मॅडम, मी तुमचे नाव घेतले होते. यावर सोनिया भडकल्या आणि त्यांनी माझ्याशी बोलू नकोस असे स्मृतीला फटकारले, यानंतर स्मृती आणि सोनिया गांधी यांच्यात जोरदार वादावादी झाली. ही वादावादी 2 ते 3 मिनिटे चालली. तर स्मृती इराणी यांच्या १८ वर्षाच्या मुलीचा गोव्यातील बार आणि रेस्टॉरंटचे प्रकरण बाहेर काढल्यानेच त्याचा वचपा स्मृती इराणी काढतांना दिसत होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments