Homeराज्यबिलोली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अंमलदार मयत भगवान वाघमारे यांच्या कुटुंबियांना पोलीस...

बिलोली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अंमलदार मयत भगवान वाघमारे यांच्या कुटुंबियांना पोलीस अधीक्षकांनी दिला पन्नास लाख रुपयांचा चेक…

महेंद्र गायकवाड
नांदेड

बिलोली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अंमलदार सपोउपनि भगवान नागोराव वाघमारे (5177) हे कर्तव्य पार पाडत असतांना त्यांना कोव्हीड-19 या सांसर्गिक रोगाची लागन होवुन ते मरण पावले होते. त्यांच्या कुटुंबियांना आज पन्नास लाख रुपयांचा चेक पोलिस अधीक्षकांनी दिला आहे.

मयत वाघमारे यांचे कायदेशिर वारसदार म्हणून त्यांची पत्नी श्रीमती ज्योती भगवान वाघमारे व मुलगा शैलेश भगवान वाघमारे यांना प्रत्येकी पंचवीस लाख रूपये असे एकुण पन्नास लाख रूपयाचा चेक पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांचे हस्ते आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी पोलीस अधिक्षक नांदेड यांचे कक्षात प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उप अधीक्षक मुख्यालय श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी हे हजर होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments