Homeराज्यस्टेट बँकेमुळे गरीब श्रीमंत दरी कमी झाली…अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी

स्टेट बँकेमुळे गरीब श्रीमंत दरी कमी झाली…अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी

बँकेकडून सिद्धगिरी हॉस्पिटलला ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान

कोल्हापूर प्रतिनिधी-राजेंद्र ढाले

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील एक प्रमुख वित्त संस्था असून बँकेच्या गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांसाठी ची असलेल्या ऋण आणि ठेव योजनांमुळे राष्ट्राचा विकास होत असून त्यामुळे देशातील गरीब श्रीमंत यांच्यातील दरीही कमी होत आहे असे प्रतिपादन कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य कार्ड सिद्धेश्वर स्वामी यांनी केले. येथे आयोजित स्टेट बँकेकडून सिद्धगिरी हॉस्पिटल ला चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्रदान कार्यक्रमात बोलत होते.

सिद्धगीरी हॉस्पिटलचे संचालक आणि प्रख्यात न्यूरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी यापूर्वी स्टेट बँकेकडून मिळालेल्या मशिनरीज च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या सेवा मोफत देता आल्याचे सांगितले.

स्टेट बँकेचे महाराष्ट्र मंडल चे मुख्य महाप्रबंधक अजय सिंग यांनी सिद्धगिरी मठाच्या सुरू असलेल्या गोशाळा उपक्रमाचे कौतुक केले.
मठाचे कार्यकारी संचालक बारामतीकर सिद्धगिरी मठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

प्रास्तावीक सिद्धगिरी हॉस्पिटलचे एच. आर. विवेक सिद्ध यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी जी.वड्ड यांनी केले. या कार्यक्रमाला हॉस्पिटलचे मेडिकल सुप्रीटेंडंट प्रकाश भरमागोडर आणि सर्व डॉक्टर्स, एस बी आय चे क्षेत्रिय प्रबंधक विवेक कुमार सिन्हा, उप महाप्रबंधक एम.एन. प्रसाद, सहाय्यक महाप्रबंधक राकेश चंद्र, प्रादेशिक व्यवस्थापक विवेककुमार सिंग, गुरुकुलम चे कुलकर्णी , विक्रम पाटील उपस्थित होते.

कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल ला स्टेट बँक ऑफ इंडिया कडून चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले त्यावेळी बोलताना अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी व मान्यवर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments