HomeMarathi News Todayराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या नांदेडमध्ये...सभासद नोंदणीचा विधानसभानिहाय घेणार आढावा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या नांदेडमध्ये…सभासद नोंदणीचा विधानसभानिहाय घेणार आढावा

महेंद्र गायकवाड
नांदेड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या दि. 20 सप्टेंबर रोजी नांदेडमध्ये येणार असून विधानसभानिहाय पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. तसेच सदस्य नोंदणीचाही आढावा घेतील, माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांच्यासह आदी मान्यवर आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दि. 20 सप्टेंबर रोजी हिंगोली, नांदेड, लातूर या तीन जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. सकाळी 11.30 वाजता हिंगोली येथून नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी 12.45 ते 1.30 या दरम्यान राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या निवासस्थानी ते सदिच्छा भेट देतील. दुपारी 1.30 ते 3.30 या वेळेत नांदेड ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर व प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी 3.30 ते 4.30 या वेळेत नांदेड शहर जिल्हा कार्यकारिणीची शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक, 4.30 वाजता नांदेड येथून लातूरकडे प्रयाण करणार आहेत.

या बैठकीमध्ये पक्ष संघटनेचा विधानसभानिहाय आढावा घेण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियान राबवत आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे का नाही, यासंदर्भातीलही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आढावा घेणार आहेत. आयोजित केलेल्या बैठकीला विधानसभा मतदार संघाचे आजी-माजी आमदार, प्रदेश प्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, पक्ष निरीक्षक, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, युवक, महिला, विद्यार्थी, युवती, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा स्तरावर सर्व फ्रंटल व सेलचे अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यांनी शंभर टक्के उपस्थित राहणे एक तास अगोदर अनिवार्य आहे. या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहनही नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments