Homeराज्यराज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेला आज प्रारंभ…

राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेला आज प्रारंभ…

सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे

महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन संलग्न शटल बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने सबज्युनिअर YONEX SUNRISE स्पर्धा व आमदार चषक निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा स्कूल ऑफ बॅडमिंटन फाऊंडेशन, कृष्णा व्हॅली,कुपवाड व धीरज कुमार अकॅडमी स्फुर्ती चौक, सांगली येथे सबज्युनिअर स्पर्धांचें उद्घाटन शटल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मा. आ. सुधीर गाडगीळ यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या प्रसंगी बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले,वय वर्षे ११ या वयोगटातील सब ज्युनिअर या स्पर्धा पहिल्यांदाच सुरू होत आहेत.याचा सन्मान प्रथमच सांगलीला मिळत आहे.या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व युवा खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यास मिळावे त्यासाठी प्रत्येक खेळाडूने खेळात चांगली कामगिरी करावी या शुभेच्छा देतो.तसेच महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षा सौ. माणिक परांजपे, स्पर्धा कमितीचे अध्यक्ष डॉ. राजीव उर्फ आर. बी. कुलकर्णी, सांगली जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन चे संचालक उदय माळी,सुगम शहा,सचिन सारडा,सचिन कुलकर्णी,तेजस गाडगीळ, मुख्य पंच पारिजात नातू,सर्व खेळाडू व बॅडमिंटन प्रेमी उपस्थित होते…

या स्पर्धसाठी महाराष्ट्रतून ४३५ स्पर्धकांनी भाग घेऊन चुरसीच्यां सामन्यांना आज सुरवात झाली. सांगलीच्या पिहू शहाने नांदेडच्या अनन्या कडबे हीला पराभूत करून आजचा दिवस पिहू शहाने गाजवला.

उद्या पासून तीन दिवस सामने चालू रहाणार आहेत. दि.२ जुलै रोजी संध्याकाळी ४.३० वाजता बक्षिस वितरण समारंभ मा.आ.सुधीरदादा गाडगीळ व प्रदीप गंधे,डेप्युटी प्रेसिडेंट महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांचे शुभ हस्ते करण्यात येणार आहे.

दुपार पर्यंतचे निकाल पुढील प्रमाणे :

वय वर्षे १३गटातील मुली :
1)युती शिंदे,नागपूर विजयी विरुद्ध श्रावणी आरडे, पुणे,७-१५/१५-१०/१५-१२
2) मनीषा कोल्हे,पुणे विजयी विरुद्ध सूर्या कणसे,सातारा १५-९/१५-१३
वय वर्षे ११गटातील मुली :
1) शरयू चुबे, सिंधुदुर्ग, विजयी विरुद्ध राही शिंदे,सांगली १५-१०/५-१५/१४-१५
2) पिहू शहा,सांगली विजयी विरुद्ध अनन्या कडबे, नांदेड १५-६/१५-१२
वय वर्षे १३ गटातील मुले :
1) मयांक राजपूत,नागपूर विजयी विरुद्ध अन्वित नेने, ठाणे १५-५/१५-७
2) शौर्य कदम,कोल्हापूर विजयी विरुद्ध अथर्व कचरे,अमरावती १५-१२/१५-४
वय वर्षे ११ गटातील मुले :
1) हिंमाशू भाटकर,रायगड विजयी विरुद्ध अविनाश खिरतकर,नागपूर १५-११/१५-१०
2) शौर्य होरणे,कोल्हापूर विजयी विरुद्ध पर्णव भाले, परभणी १५-१०/१५-१३

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments