रामटेक – राजु कापसे
कोरोना प्रादुर्भावामुळे रामटेक तालुक्यातील अनेक महिला विधवा झाल्या.यामुळे त्यांना आपले कुटुंब चालवण्यासाठी आणि जीवनयापण करण्यासाठी मोठ्या समस्या निर्माण झाल्या.या महिलांची ही समस्या ओळखून महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी आतापर्यंत २०० विधवा महिलांना शिलाई मशीन दिल्या,अशी माहिती रामटेक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलाश राऊत यांनी प्रतिनिधीला दिली आहे.
आज 20 जून ला करवाही आणि लोधा येथील विधवा महिलांना मुळक यांच्या वतीने शिलाई मशीन देण्यात आली.यावेळी रामटेक येथील कार्यालयात कैलास राऊत या बाबतीत माहिती देत होते.राजेंद्र मुळक यांच्या या सहकार्यमुळे या महिलांना घरीच दोन पैसे कमविण्याची संधी मिळून त्यांचे जीवन सुखरूप होण्यास मदत मिळेल.
यामुळे रामटेक तालुका काँग्रेसच्यावतीने आपण राजेंद्र मुळक यांचे अभिनंदन करीत असल्याचेही कैलास राऊत म्हणाले.नागपूर जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष म्हणून राजेंद्र मुळक हे गरजू लोकांना सतत मदत,सहकार्य करण्याच्या प्रयत्नात असतात.आतापर्यंत झालेल्या जिल्हाध्यक्षामध्ये राजेंद्र मुळक यांचे कार्य सर्वात चांगले असल्याचेही कैलाश राऊत यांनी सांगितले.