Friday, March 29, 2024
Homeकृषीशेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणार…राजू पोवार यांचा इशारा…विधानसभेवर रयत संघटनेचा मोर्चा….

शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणार…राजू पोवार यांचा इशारा…विधानसभेवर रयत संघटनेचा मोर्चा….

Share

राहुल मेस्त्री….

देशातील नेते मंडळी व राजकारणांना निवडून देण्याचे काम सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांनी केले आहे. पण निवडून गेल्यानंतर शेतकरी विरोधी धोरण अवलंबून त्यांना चिरण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी राजकीय नेते मंडळींना वेळ कमी पडत आहे. परिणामी शेतकरी दिवसेन दिवस अडचणीत सापडत आहे. शेतकरी हा मालक असून त्याच्यावर अन्याय झाल्यास रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा.

कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. शेतकरी हुतात्मा दिन आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत संघटनेतर्फे बेळगाव येथील विधानसभा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी राजू पोवार बोलत होते.
पुढे राजू पोवार म्हणाले, ढोणेवाडी शाळेतील अनुष्का सदाशिव भेंडे या विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबाला ५० लाखांची आर्थिक मदत मिळावी, यासाठी आपण आंदोलन केले. मात्र मंत्र्यांनी केवळ ५ लाखांचा धनादेश देत त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. हिंमत असेल तर राज्य सरकारकडून ५० लाखांची भरपाई मिळवून दिल्यास लोकप्रतिनिधींचा जाहीर सत्कार करू असे आव्हान दिले.

महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सर्व्हे चुकीचा झाला असून याकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्याला कोणतीही जात, धर्म नसून केवळ राजकारणासाठी शेतकऱ्यांची कामे थांबवली जात असल्यास या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

यावेळी रयत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, गौरव अध्यक्ष शशिकांत पडसलगी, गणेश ऐगर, राघवेंद्र नाईक, प्रकाश नाईक यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व्यक्त केल्या.

याप्रसंगी रवी सिद्धनावर, चंद्रगौडा पाटील, उमेश भारमल, भगवंत गायकवाड, सर्जेराव हेगडे, संजय पोवार, कलगोंडा कोटगे, नामदेव साळुंखे, बाबासाहेब पाटील, विजय गुरव, बाळकृष्ण पाटील, सुभाष देवर्षी, विवेक जनवाडे, हालप्पा ढवणे, बबन जामदार, रमेश मोरे, पवन माने, वैभव कुंभार, बाळू साळुंखे, सदाशिव शेटके, अशोक कुंभार, संजय जोमा, हरी जाधव, नाना कुंभार,माणिक कांबळे, अनंत पाटील, रामगोंडा पाटील, रवींद्र चेंडके, आर. वाय. पाटील यांच्यासह निपाणी, हुक्केरी, अथणी, गोकाक, बेळगाव तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: