Friday, March 29, 2024
Homeगुन्हेगारीसनी लिओन आणि टायगर श्रॉफचा होणार होता लाईव्ह कॉन्सर्ट…कोट्यवधी रुपयांची झाली तिकीट...

सनी लिओन आणि टायगर श्रॉफचा होणार होता लाईव्ह कॉन्सर्ट…कोट्यवधी रुपयांची झाली तिकीट विक्री…आणि अचानक आयोजक झाले फरार…

Share

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील एकना स्टेडियमवर होणारा लाईव्ह कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. या कॉन्सर्टमध्ये बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफ, सनी लिओन, मौनी राय आणि गायक गुरु रंधावा यांसारखे कलाकार सादर करणार होते, परंतु आयोजकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले आहेत. एकना स्टेडियमनेही कार्यक्रम रद्द केल्याची पुष्टी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार 20 नोव्हेंबर रोजी लखनऊच्या एकना स्टेडियममध्ये आयोजक विराज अरविंद त्रिवेदी यांच्याकडून लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात येणार होता, मात्र त्यापूर्वीच आयोजक पळून गेले. मोबाईल एप्स आणि इतर माध्यमातून या कार्यक्रमाच्या कोट्यवधी रुपयांच्या तिकिटांची विक्री झाली. तर स्टेडियम 1.50 कोटी रुपयांना बुक करण्यात आले होते. वेळापत्रकानुसार हा शो काल म्हणजेच रविवारी होणार होता.

लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात शोच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विराज अरविंद त्रिवेदी यांनी त्यांची पत्नी श्वेता, सुविधा फाऊंडेशनचे संचालक समीर शर्मा यांच्यासह काही नातेवाईकांची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप हाऊस किपिंग कंपनीचे मालक रणदीप भाटिया यांनी केला आहे. नोंदवलेल्या गुन्ह्यात एकना स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमाचा उल्लेख नसल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. मात्र, याशिवाय इतरही अनेक आरोप करण्यात आले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराज अरविंदने शोसाठी एकना स्टेडियम 1.50 कोटी रुपयांमध्ये बुक केले होते. त्यासाठी सुमारे 10 लाख रुपये एडव्हान्सही देण्यात आला होता. सोशल मीडियावर त्याचा प्रचार केला. कार्यक्रमाबाबत वृत्तपत्रांमध्ये मोठ्या जाहिरातीही दिल्या गेल्या, त्यानंतर एकना स्टेडियम व्यवस्थापनाने आक्षेप घेतला. संपूर्ण रक्कम जमा करून सर्व संबंधित विभागांकडून एनओसी घेऊनच स्टेडियमचे नाव जाहिरातींमध्ये प्रसिद्ध करायचे.

आयोजकाच्या घराला कुलूप लटकलेले आढळले
सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा तपास केला असता त्यांनाही धक्का बसला. लखनौच्या सेलिब्रिटी गार्डनमध्ये विराजच्या भाड्याच्या फ्लॅटलाही कुलूप आहे. सुमारे दोन-तीन दिवसांपासून येथे कुलूप असल्याचे आजूबाजूच्या लोकांनी सांगितले.

लखनऊचे डीसीपी दक्षिण राहुल राज यांनी सांगितले की, शोसाठी तिकीट खरेदी करणाऱ्यांपैकी कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. दुसरीकडे, एडीसीपी मनीषा सिंह यांनी सांगितले की, रणदीपने दाव्यात लिहिले आहे की, आयोजकांनी स्टेडियमसाठीही संपूर्ण रक्कम जमा केली नाही. सर्वजण फरार आहेत. कारच्या नावावर फसवणूक केल्याचा आरोप रणदीपने केला आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: