रामटेक – राजू कापसे
मनसर सारख्या लहानशा खेड्यात जन्मलेल्या व स्वकर्तुत्वाने अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी पोहोचलेल्या तसेच वैद्यकीय व्यवसायातील अनेक सन्मानजनक पुरस्कार पटकाविणार्या डाॅ.सोनम चौकसे गुप्ता यांनी मिसेस इंडीया इंक २०२२ या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत अंतीम फेरीत धडक दिली आहे. येत्या १५ जून २०२२ रोजी स्पर्धेची अंतीम फेरी मुंबई येथे
होणार असून यामध्ये एकूण ५२ स्पर्धक सहभागी होणार आहे.
डाॅ.सोनम या मनसर येथील व्यावसायिक महिपाल चौकसे व सरोज चौकसे यांच्या सुपुञी व उद्योजक सौरभ चौकसे यांच्या भगिनी आहे. डाॅ.सोनम यांचे माध्यमिक शिक्षण कन्हान येथे झाले.त्यांनी यवतमाळ मेडीकल काॅलेजमधून एमबीबीएस ची पदवी पुर्ण केली व एमडी साठी त्या अमेरिकेत गेल्या. डाॅ.सोनम यांना सलग तीन वर्ष उत्तम वैद्यकीय सेवा प्रदान केल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डाॅ.सोनम यांच्या मते गर्भवती महिलांना आवश्यक तो उपचार व माहिती मिळत नसल्यामुळे त्यांना ञास व यातना भोगाव्या लागतात.आंतरराष्र्टीय स्तरावर व भारतात या संदर्भात त्या त्यांच्या प्रिव्हलाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना वैद्यकीय सेवा व उपचार देण्याचा त्यांचा मानस आहे.
या सर्व कामी त्यांचे पति डाॅ.सौरभ गुप्ता,सासरे डाॅ.आर.के.गुप्ता,सासु डाॅ.निलम गुप्ता,वडील महिपाल चौकले,आई सरोज,भाऊ सौरभ व वहिनी मिसेस युनिवर्स मध्ये सहभागी शेफाली चौकसे राॅय यांचे मार्गदर्शन व पाठींबा डाॅ.सोनम यांना प्रोत्साहित करित असतो असे डाॅ.सोनम यांनी बोलताना सांगितले.