HomeCrimeपोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडून २५ जूनला तक्रार निवारण दिनाचे आयोजन...

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडून २५ जूनला तक्रार निवारण दिनाचे आयोजन…

सांगली – ज्योती मोरे

सांगली जिल्ह्यातील लांब राहत असलेल्या तक्रारदारांना त्यांच्या शंकांचे निरसन न झाल्याने वारंवार सांगलीला मुख्यालयात यावे लागते. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. हे टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी, उद्या शनिवार दिनांक २५ जून २०२२ रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले आहे.

दरम्यान ज्या ज्या नागरिकांना आपल्या तक्रारींचे निवारण करायचे अथवा या तक्रारी बाबत काही अडचणी असल्यास अशा तक्रारदारांनी त्या त्या उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच पोलिस ठाण्यात सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान उपस्थित रहावे. असे अवाहन पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments