Homeखेळसुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या विद्यार्थ्यांचे समुद्रातील जलतरण स्पर्धेमध्ये...

सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या विद्यार्थ्यांचे समुद्रातील जलतरण स्पर्धेमध्ये यश…

सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.

श्री. दुर्गामाता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ,विजयदुर्ग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या फोर्थ सी चैनल स्विमिंग कॉम्पिटिशन 2022 या स्पर्धेमध्ये आयुष कोटे याने बारा वर्षे वर्षाखालील दोन किलोमीटर अंतराच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 17:2 मिनिटांमध्ये व हर्षित कुंभार याने तृतीय क्रमांक 17 ;9 मिनिटांमध्ये पटकाविला तसेच संग्राम चिंचकर याने 14 वर्षाखालील वयोगटांमध्ये तीन किलोमीटर मध्ये अंतर समुद्रात पार करण्यासाठी 45.8 मिनिटांमध्ये पार करून सहाव्या क्रमांक पटकाविला. त्यामध्ये त्यांना प्रमाणपत्र व मेडल व रोख रक्कम बक्षीस देण्यात आली नव कृष्णा वेलीचे स्कूलचे विद्यार्थी दररोज सकाळी व सायंकाळी या वेळेमध्ये सराव करीत असतात.

या विद्यार्थ्याना स्विमिंग प्रशिक्षक श्री. नामदेव नलावडे सुरज स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख श्री. विनायक जोशी क्रीडा शिक्षक श्री सुशांत सूर्यवंशी व श्री तेजस शेटे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले या यशाबद्दल सुरज फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण लुंकड सर सचिव एन .जी. कामत संचालिका सौ. संगीता पागनीस एच. आर. गीतांजली देशमुख प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना कुंभार माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अधिकराव पवार श्री प्रशांत चव्हाण उप प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्व पालक व विद्यार्थी यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments