कोल्हापूर – राजेद्र ढाले
कोल्हापूर विमानतळावर अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज ३९०० चौ. मी. च्या विस्तीर्ण जागेत बांधण्यात येत असलेल्या टर्मिनल बिल्डिंग तसेच एटीसी टॉवर व फायर स्टेशनलचे काम तीन वर्षांपासून रखडले असून जाणकारांच्या मतानुसार अध्याप फक्त ५५ टक्क्यांपर्यंत काम झाले असून टर्मिनल बिल्डिंग व एटीसी टॉवर चे बांधकाम कधी पूर्ण होणार याकडे कोल्हापूरकरांसह विमान ही उत्सुकता तसेच रखडलेल्या कामाबाबत संताप पाहायला मिळत आहे.
सदर कामाची पायाभरणी तत्कालीन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते २ फेब्रुवारी १९ रोजी पार पडला परंतु प्रत्यक्षात ५ जून १९ रोजी कामाला सुरुवात झाली. काम पूर्ण होण्यासाठी १८ महिन्याचा कालावधी आधी लागणार असल्याचे त्या वेळी सांगण्यात आले होते परंतु प्रत्येक वेळी तारीख पे तारीख देत सदर काम रखडत आहे.
नाशिकच्या हर्ष कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून टर्मिनल बिल्डिंग एटीसी टॉवर बांधकाम चालू असून तब्बल तीन वर्ष उलटूनही अद्याप ५५ टक्क्यांपर्यंत काम झाल्यामुळे टर्मिनल बिल्डिंग चे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी अजुन किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे खडक लॉकडाउनच्या काळातही जिल्हा प्रशासनाकडून सदरचे काम अखंडित सुरू ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते.
दरम्यान प्रशासनाकडून डिसेंबर २२ पर्यंत टर्मिनल बिल्डिंगचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात येत असले तरीही प्रत्यक्ष कार्यस्थळावरिल मनुष्यबळ, यंत्रसामुग्री , पाहता डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होईल याबाबत प्रवाशांकडून शंका व्यक्त करण्यात येत आहे. लवकर काम पूर्ण होण्यासाठी कामाचे तास, यंत्रसामुग्री व मनुष्यबळ वाढवण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

टर्मिनल बिल्डिंग ची वैशिष्ट्ये स्थानिक टर्मिनल बिल्डिंग बरोबरच एटीसी टॉवर व फायर स्टेशन अंदाज पत्रकीय खर्च २७५ कोटी रुपये तीनशे प्रवाशांची पिकावर हाताळणी क्षमता १० चेक इन काउंटर, गो ग्रीन ब्रीद वाक्या नुसार शाश्वत पर्यावरण पूरक टिकाऊ बांधकाम, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना (आर सी एस) उडाण अंतर्गत विमानतळाचा विकास व विस्तारीकरण एलईडी लाइट्स, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सुसज्ज पार्किंग व्यवस्था,
गार्डन सह परिसर सुशोभीकरण तारीख पे तारीख २ फेब्रुवारी २०१९ रोजी पायाभरणी ५ जून २०१९ ला प्रत्यक्ष कामाला सुरुवात काम पूर्ण करण्यासाठी कालावधी १८ महिने डिसेंबर २०२० पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित कोरोणा मुळे डिसेंबर २०२० पर्यंत कामास मुदतवाढ १६ डिसेंबर २०२० मध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून आढावा पालकमंत्र्यांच्या एप्रिल २२ पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना जून पर्यंत ५५ टक्क्यांपर्यंत काम प्रशासनाकडून डिसेंबर २०२२ पर्यंत काम पूर्ण होणार सांगितले जात आहे.
बांधकाम रखडण्याची कारणे
कोरोणा संसर्गाच्या काळात लोक डाऊन असल्यामुळे कामाच्या गतीवर परिणाम तरीही जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या विशेष परवानगीने टर्मिनल बिल्डिंगचे काम अखंडितपणे सुरू होते.
परंतु परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणावर गावी गेल्यामुळे कामाचा वेग मंदावला बांधकामासाठी स्टीलचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत असून स्टील व इतर बांधकाम साहित्याचे वाढलेले प्रचंड दर ठेकेदाराकडून होत असलेली चालढकल १) कोल्हापूर विमानतळ येथील रखडलेले टर्मिनल बिल्डिंगचे बांधकाम २) विमानतळावरील संथ गतीमुळे अर्धवट असलेले तिकिटावर व फायर स्टेशन बिल्डिंगचे बांधकाम.