Homeगुन्हेगारीखासदार नवनीत राणांच्या जीवाला धोका असल्याचे ते निनावी पत्र...पत्र देणारी व्यक्ती कोण?...

खासदार नवनीत राणांच्या जीवाला धोका असल्याचे ते निनावी पत्र…पत्र देणारी व्यक्ती कोण?…

अमरावती शहरात गुन्हेगारीत आता विदर्भात अव्वल स्थानी येत असल्याचे दिसत असून या शहरात दररोज गुन्हेगारीच्या घटना समोर येतात, आता तर खासदार नवनीत राणा यांच्या जीविताला धोका असल्याचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. खासदार नवनीत राणा यांचा हितचिंतक असणाऱ्या मुस्लिम व्यक्तीने याबाबत खासदारांना पत्र पाठवून महिती देत आपुलकी दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.

नमस्ते मॅडम.

मी आपल्याला माझे नाव सांगू नाही शकत, मी शहरातील सर्वसामान्य व्यक्ती आहे. मी आपणास सूचित करतो कि, आपण थोडे सांभाळून राहावे, काही लोक आपला पाठलाग करीत असल्याची माहिती असून आपण सांभाळून राहावे असे या पत्रात नमूद आहे. अमरावती शहरात राजस्थानच्या सीमेवरून काही संशयित व्यक्त आले आहेत. हे लोक तुमच्या घरी येऊन गेल्याचा उल्लेख देखील या पत्रात आहे.

आपण माझा वडिलांच्या कोरोना काळात मदत केली होती. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्या संदर्भात निनावी पत्र आज त्यांच्या शंकर नगर स्थित निवासस्थानी प्राप्त झाले आहे. यासंदर्भात युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पत्र देणारी व्यक्ती कोण?

खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्या संदर्भात खासदार नवनीत राणा यांच्या घरी पत्र आणून देणारी व्यक्ती नेमकी कोण आहे याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या पत्रामध्ये राजस्थानच्या सीमेवरून काही लोक अमरावतीत आले असून, ते खासदार नवनीत राणा यांच्या घरी सुद्धा जाऊन आले असल्याचे नमूद आहे.

सीसीटीव्ही फुटेज चेक करणार

खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्या संदर्भात नेमके पत्र कोणी आणून दिले याबाबत खासदार नवनीत राणा यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील सर्व फुटेज तपासले जाणार आहे. तसेच गत काही दिवसात कोण संशयित व्यक्ती खासदार नवनीत राणा यांच्या घरी येऊन गेले ते सुद्धा सीसीटीव्ही फुटेज द्वारे तपासले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments